घरCORONA UPDATECorona News: कोरोनाची चौथी लाट येणार, BHU च्या संशोधनाने वाढवली चिंता, अवघ्या...

Corona News: कोरोनाची चौथी लाट येणार, BHU च्या संशोधनाने वाढवली चिंता, अवघ्या १७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज

Subscribe

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तज्त्रांनी चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तज्त्रांनी चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध शिथिल केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचदरम्यान, बीएचयू BHU च्या कोरोनो सर्वे म्हणजेच सिरो सर्वेने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार बीचयूने सिरो सर्वेसाठी ११६ जणांचे नमुने घेतले होते. नमुन्याच्या तपासणीतून अनेक धक्कादायक आकडे समोर आले आहेत. त्यानुसार या ११६ जणांपैकी फक्त १७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून त्यांच्या मते जर ७० टक्क्याहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज संपल्या असतील तर .येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू शकतो. यामुळे बूस्टर डोझ घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

भारतात जानेवारी २०२२ पासूनच बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहील्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, सुरक्षा कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना डोस घेणे अनिर्वाय करण्यात आले होते. पण अद्यापही डोस घेण्यास नागरिक अनुत्सुक आहेत. तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ८० टक्के आहे. तर दुसरीकडे १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -