IPL 2022: अर्जुनचा करेक्ट यॉर्कर; इशान किशानला केलं त्रिफळाचीत

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या कसून सराव करताना पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या पदार्पणासाठी अर्जून मैदानात घाम गाळताना दिसतोय. शिवाय मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या पर्वात एकही सामना जिंकता आला नाही.

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या कसून सराव करताना पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या पदार्पणासाठी अर्जून मैदानात घाम गाळताना दिसतोय. शिवाय मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या पर्वात एकही सामना जिंकता आला नाही. दरम्यान, अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा सुरू असतानाच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा स्टार बॅटर इशान किशनची एका अचूक यॉर्करवर दांडी उडवली आहे.

मुंबई इंडियन्सचा आज चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध सामना होणार आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या खेळाडूंनी नेट्समध्ये जोरदार अभ्यास केला आहे. या सामन्यात अर्जूनला संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

अर्जुन तेंडुलकरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आयपीएल 2022च्या ऑक्शनमध्ये सर्वात जास्त किंमत मिळलेल्या इशान किशनला अर्जुनच्या यॉर्करपुढे कसलाही बचाव करता आला नाही. इशानने बॅट जमिनीवर आणण्यापूर्वीच त्याची दांडी उडाली होती. अर्जुनचा हा जबरदस्त यॉर्कर पाहून त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्याची मागणी फॅन्सनी केली आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ :

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी


हेही वाचा – IPL 2022 : याला म्हणतात कामगिरी! तीन सामने, तीन विजय, तीन वेळा हाच खेळाडू ठरला सामनावीर