घरताज्या घडामोडीCorona Vaccination: कॅलिफोर्नियात वॅक्सीन जॅकपॉट, १० विजेत्यांना मिळाले लाखोंचे बक्षीस

Corona Vaccination: कॅलिफोर्नियात वॅक्सीन जॅकपॉट, १० विजेत्यांना मिळाले लाखोंचे बक्षीस

Subscribe

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वॅक्सीन लॉटरीचे १० विजेत्यांच्या नावाची घोषणा केली गेली आहे. वॅक्सीन जॅकपॉटच्या माध्यमातून जाहीर केलेल्या विजेत्यांमधील प्रत्येकाला बक्षीस स्वरुपात १५ लाख रुपये दिले जाईल. शहरातील कोरोना निर्बंध कमी करण्याच्या टप्प्यात गव्हर्नर गेविन न्यूसम (Governor Gavin Newsom) यांनी मंगळवारी युनिव्हर्सल स्टुडियोजमध्ये लसीचा डोस घेणारे कॅलिफोर्नियातील १० लोकांना बक्षीस देण्याची घोषणा केली. लोकांमध्ये लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सध्या अनेक शहरांमध्ये कॅलिफोर्नियासारखे अनेक कार्यक्रम राबवले जात आहे. कॅलिफोर्नियाने लस घेतल्यानंतर पुरस्कृत करण्याचा कार्यक्रम ‘Vax for the Win’ केला गेला.

लॉस एंजेल्समध्ये नर्स कोरडोवा (Cordova) राज्याची पहिली नागरिक आहे, जिने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘हा त्याच्या करिअर मधला वाईट काळ होता, जेव्हा इतक्या जणांचा मृत्यू होत होता.’ दरम्यान आता २२ मिलियन लोकांमध्ये १० विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. या विजेत्यांनी लसीचा एक डोस तरी घेतला आहे.

- Advertisement -

२०१९ सालच्या अखेरिस चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. याच्या दोन ते तीन महिन्यानंतर ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने याला महामारी म्हणून घोषित केले. कोरोनामुळे सर्वात बिकट परिस्थिती अमेरिकेची झाली आहे. अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियामध्ये पूर्णपणे निर्बंध हटवण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांना लस देण्यासाठी अनेक योजना करत आहे. लस घेतल्यानंतर धनराशि देणारे कॅलिफोर्निया हे पहिले राज्य आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: अमेरिकेत ८९९ लोकांना दिले एक्सपायर झालेल्या लसीचे डोस

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -