घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाचा अफगाणिस्तानावर होणार सर्वाधिक परिणाम!

CoronaVirus: कोरोनाचा अफगाणिस्तानावर होणार सर्वाधिक परिणाम!

Subscribe

अफगाणिस्तानसाठी येणारा काळ खूप कठीण असणार आहे, अशा इशारा ग्लोबल मायग्रेशन एजन्सीने दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन इतर देशांपेक्षा अफगाणिस्तानात कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वात जास्त होण्याची शक्यता वर्तवली आहे. युद्धग्रस्त देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असेअहवालात म्हटले आहे.

इंटरनॅशल ऑर्गनाइजेशन फॉर मायग्रेशन (IOM)ने म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानमध्ये ५ मेपर्यंत कोरोनाचे २ हजार ९०० रुग्ण होत. तर ९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.’ दरम्यानच अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, त्वरित उपयायोजना न केल्यास देशातील ३.५ कोटी लोकसंख्यापैकी ८० टक्के लोक कोरोनाबाधित होऊ शकतात.

- Advertisement -

इतर देशांच्या तुलनेत अफगाणिस्तानमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असू शकते. अलीकडेच ५० ते ७० लाख लोखसंख्या असलेल्या काबुलमधील ५०० व्यक्तींच्या नमून्यांमध्ये ५० टक्के कोरोनाचे संसर्ग झाल्याचे समोर आले आहे, असे  मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जगभरात कोरोनाचे आतापर्यंत ३७ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानात आतापर्यंत कोरोनाचे ३ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -