घरताज्या घडामोडीनाशिक जिल्हा ५०० पार; बुधवारी दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा ५०० पार; बुधवारी दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात चार अधिकार्‍यांची नियुक्ती 

मालेगावातील करोनाबाधितांची वाढती संख्या कायम असून, बुधवारी (दि.६) सायंकाळपर्यंत मालेगावात ३२ करोनाबाधित आढळून आले. त्यातील दोघांची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मालेगावात एकूण ४१५ रुग्ण आहेत, तर नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्ण ५०१ पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, मालेगावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, सीआयडी नाशिकचे पोलीस अधीक्षक अजय देवरे, पीटीएस अकोला येथील प्रशांत वाघुंडे व महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची मालेगावात तात्पुरती नियुक्ती कण्यात आली आहे.

मालेगावात बुधवारी दिवसभरात प्रशासनाला १३८ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यातील १०७ निगेटिव्ह, तर ३२ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यात ३० नवीन रुग्ण पॉझिटिव्ह असून, दोघांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पोलीस व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुनील कडासने, अजय देवरे, प्रशांत वाघुंडे, आनंद भोईटे यांची मालेगाव येथे तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे कायदा व सुव्यवस्था पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नियुक्तीबाबत आदेश काढले आहेत. सुनील कडासने यांनी मालेगावात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. या काळात त्यांनी पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ते उर्दू भाषेचेे जाणकार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -