घरदेश-विदेशमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; मात्र कुटुंब सुखरूप

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; मात्र कुटुंब सुखरूप

Subscribe

मुख्यमंत्री शिवराज यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाविरूद्ध युद्ध लढवण्यास शिवराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवराज यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांच्या अहवालावरून त्यांना कोरोनाचा किरकोळ संसर्ग झाला असून तो संसर्ग फारसा पसरलेला नाही, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तर मुख्यमंत्री शिवराज यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा चाचणी अहवालही आला असून शिवराज यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी १४ दिवसांसाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे.

जो कोणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची चाचणी करून घ्यावी, असे मुख्यमंत्री शिवराज यांच्या कुटुंबियांनीही आवाहन केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लक्षणं दिसताच त्यांना कोरोना चाचणी केली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर २५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही संपर्कात असलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले. आज एकामागून एक ट्विट करून शिवराज यांना कोरोना वॉरियर्सचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन फूटांचे अंतर ठेवणे, हात धुवा आणि मास्क लावणे हे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे, असे सांगितले आहे.


Corona : उत्तर कोरियात आढळला पहिला रूग्ण; किम जोंगने केली Emergency लागू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -