Lockdown: लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात

करोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन आहे. यावेळी, उत्तराखंडच्या खटीमा येथे लग्नाची मिरवणूक काढणार्‍या वरासह ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Police arrest 8 persons with groom
लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात

देशात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही असे महाभाग असतात जे सराकार घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करतात. असेच एक प्रकरण उत्तराखंडमधील खटीमा येथील समोर आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळा. कार्यक्रम, लग्न सर्व रद्द करा, असे आवाहन केले असताना उत्तराखंडमध्ये लग्न लावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्या मुलासह आठजणांना ताब्यात घेतले आहे.

उत्तराखंडमधील खटीमा येथे लॉकडाऊनचे उल्लंघन करत लग्नाची वरात काढण्यात आली. मात्र, ही वरात घरात न जाता थेट पोलीस ठाण्यात गेली. वरात काढणे नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी नवऱ्या मुलासह आठजणांना अटक केली आहे. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला असून मिरवणुकीत आणलेली सर्व वाहनेही ताब्यात घेतली.


हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचं तांडव सुरुच; करोनाचे ६२०३ नवे रुग्ण


इस्माईलनगरमधील एका घरात जमाव जमा झाल्याची माहिती खटीमा पोलिसांना १२ वाजता समजली. त्यानंतर पोलिस तातडीने तेथे पोहोचले. पोहोचताच पोलिसांना मिरवणूक असल्याचे दिसले. पोलिसांनी वर सलीम, काझी व दोन्ही बाजूच्या आठ जणांना पोलीस ठाण्यात आणले. याबाबत खटीमाचे पोलिसांनी सांगितले की, ‘इस्लामनगरमध्ये लग्न चालू आहे हे आम्हाला समजताच आमची टीम तिथे पोहोचली. आम्ही कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तथापि, सर्व कठोर सूचनांनंतर जामीन मंजूर झाला.