घरCORONA UPDATECoronavirus: इटलीत करोनाचं तांडव सुरुच; करोनाचे ६२०३ नवे रुग्ण

Coronavirus: इटलीत करोनाचं तांडव सुरुच; करोनाचे ६२०३ नवे रुग्ण

Subscribe

जगभरात करोनाचे ५ लाख रुग्ण

जगभर थैमान घालणाऱ्या करोनाने इटली, स्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला आपल्या विळख्यात घेतले आहे. दरम्यान, इटलीमध्ये करोना विषाणूचा कहर कायम आहे. इटलीमध्ये दिवसरात्र केवळ अँबुलन्सचा आवाज येत आहे. आता इटलीच्या दक्षिण भागाकडे देखील हा विषाणू पसरत आहे. इटलीमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६२०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे इटलीमध्ये करोनाचा आकडा ८०,५८९ वर पहोचला आहे.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत एका दिवसात १६ हजार करोनाचे रुग्ण; २४ तासांत २६८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

इटलीमध्ये संसर्गाची ६२०३ नवे रुग्ण आढळले आहेत. संक्रमित लोकांची संख्या ही चीनच्या बरोबरीची झाली आहे. ईटलीमध्ये गुरुवारी ७१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा ८ हजारांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे ८ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. जगभरात करोनाचे ५ लाख ३७ हजार १७ रुग्ण आहेत. तर २४ हजार ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या ६ दिवसात इटलीने गमावलेले जीव

२१ मार्च – ७९३

- Advertisement -

२२ मार्च – ६५१

२३ मार्च – ६०१

२४ मार्च – ७५३

२५ मार्च – ६८३

२६ मार्च – ७१२

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -