घरदेश-विदेशCoronavirus: चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश, विषाणूला रोखण्यासाठी सरकारचे क्रूर...

Coronavirus: चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश, विषाणूला रोखण्यासाठी सरकारचे क्रूर नियम

Subscribe

एकीकडे कोरोना विषाणूला हरवून संपूर्ण जग सामान्य दिवसांमध्ये परतत असताना चीनमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. चीन सरकार विषाणू रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहत नाही आहे. लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी लोकांना कैद करणे असो किंवा काही प्रकरणे समोर आल्यानंतर काही पाळीव प्राण्यांना मारणे असो. एका अहवालानुसार, चीनी अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, त्या ठिकाणच्या कोरोना रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याची योजना आखली होती, जी स्थानिक लोकांच्या संतापानंतर रद्द करण्यात आली.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लँगफँग शहराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अँसी जिल्ह्यातील जे कोरोनाबाधित होते त्यांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले. मात्र बुधवारी शहरातील नागरिकांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांना आपले आदेश मागे घेत कारवाई थांबवावी लागली. आदेश मागे घेण्यापूर्वी कोणत्या प्राण्याची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

चायना न्यूज सर्व्हिसने बुधवारी सांगितले की स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता “प्राण्यांची हत्या” थांबविण्यात आली आहे. मानवाकडून कुत्रे आणि मांजरींसारख्या प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग पसरल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. परंतु आतापर्यंत प्राण्यांपासून पुन्हा मानवांमध्ये विषाणू पसरल्याचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. चिनी प्रशासनाच्या या आदेशावरून बीजिंग आपल्या ‘झिरो कोविड पॉलिसी’बाबत किती गंभीर आहे हे दिसून येते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -