घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलच्या सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगीचे संकेत

IPL 2022 : आयपीएलच्या सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगीचे संकेत

Subscribe

आयपीएलचा तिकिटांसाठीचा पार्टनर असलेल्या बुकमायशो मार्फत यंदाच्या आयपीएल हंगामाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात ६ एप्रिलपासून प्रेक्षकांची क्षमता ही ५० टक्के इतकी वाढवण्यात येणार असल्याचे बुकमायशोने म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने सुरूवातीला चार ठिकाणी आयपीएलच्या मॅचेस खेळवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये वानखेडे स्टेडिअम, ब्रेबॉर्न स्टेडिअम, डीवाय पाटील स्टेडिअम, पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनचे स्टेडिअम याठिकाणी २५ टक्के प्रेक्षक क्षमतेने सामने खेळवण्याची परवानगी दिली आहे. आयपीएल सामन्यांची तिकिट विक्री सुरू झाली आहे. त्यामध्ये स्टेडिअमच्या क्षमतेत २५ टक्क्यांवरून ५० टक्के वाढ झाल्याचे बुकमायशो च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे अधिक प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये क्रिकेट अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने गुरूवारी कोरोनाच्या बाबतीत सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध २ एप्रिलपासून हटवण्यात येतील असेही महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी दिवसात म्हणजे ६ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यातील तिकिट विक्रीत वाढ होणार आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२२ साठी तिकिट खरेदी कसे कराल ?

आयपीएलच्या फॅन्सना अधिकृत अशी वेबसाईट www.iplt20.com या वेबसाईटवर तिकिट खरेदी करता येणार आहेत. बुकमायशो या संकेतस्थळावर चाहत्यांना तिकिट बुक करता येणार आहे. आधीच्या क्षमतेच्या तुलनेत अधिक प्रेक्षकांना या सामन्यांसाठी तिकिट बुक करता येणार आहेत. बुकमायशोच्या माध्यमातून ही तिकिटे बुक करता येतील.

याआधी बीसीसीआयने स्पष्ट केल्यानुसार चार ठिकाणांची निवड ही सामने खेळवण्यासाठी करण्यात आली होती. त्यामध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील स्टेडिअम, एमसीए पुणे येथे हे सामने खेळवण्यात येणार आहेत. यापैकी ७० टक्के सामने हे लीग गेम्स असतील. तर प्लेऑफचे सामनेही आगामी काळात खेळवण्यात येतील. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणे ही घोषित झालेली नाहीत. त्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येही प्ले ऑफचे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -