घरताज्या घडामोडीCoronaVirus: कर्नाटक सरकारने 'ग्रीन झोन'मधील दुकाने उघडण्याचे दिले आदेश

CoronaVirus: कर्नाटक सरकारने ‘ग्रीन झोन’मधील दुकाने उघडण्याचे दिले आदेश

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक राज्यातील काही भागामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता कर्नाटक सरकारने देखील ग्रीन झोन क्षेत्रातील दुकाने उघडण्याचा आदेश दिला आहे. उद्यापासून ५० टक्के कामगारांसह दुकाने सुरू करण्यात येणार असून मॉल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा आदेश दिला आहे. ग्रीन झोन मधील इतर ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास देखील परवानगी दिली आहे. हॉटस्पॉट किंवा रेड झोन असलेल्या भागामध्ये मेपर्यंत लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार नाही आहेत.

- Advertisement -

देशात आतापर्यंत कोरोनाचे ३१ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहे. त्यापैकी १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकात कोरोनाचे ५३२ रुग्ण सापडले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगातील कोरोनाचा आकडा ३१ लाखाहून अधिक झाला आहे. तर २ लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत ९ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: मास्क न लावल्यास ‘या’ देशात तब्बल ८ लाख रुपये दंड!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -