घरमहाराष्ट्रLockDown: सोलापूरामध्ये पेट्रोल टाकून पोलिसाला केला जाळण्याचा प्रयत्न

LockDown: सोलापूरामध्ये पेट्रोल टाकून पोलिसाला केला जाळण्याचा प्रयत्न

Subscribe

लॉकडाऊनदरम्यान गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करण्यात आला आहे तर केवळ हल्ला नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

एकीकडे देशात कोरोनाचा कहर थांबत नसताना दूसरीकडे सोलापुरातील माळशिरस तालुक्यातून धक्काधायक बातमी समोर येत आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मळोली गावात लॉकडाऊनदरम्यान गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करण्यात आला आहे तर केवळ हल्ला नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. मळोली येथे राहणाऱ्या अरूणसिंह फत्तेसिंह जाधव असे या आरोपीचे नाव आहे.

असा घडला प्रकार

वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जावेद जमादार यांना परगावहून काही व्यक्ती मळोली गावात आल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांकडून मिळाली होती. यानंतर वेळापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस शिपाई जमादार हे पोलीस मित्रासह मळोली गावात गेले. तेथे पोलीस पाटलाची वाट पाहात थांबले असता स्विप्ट मोटारीतून अरूणसिंह जाधव तेथे आला. त्याने पोलीस कर्मचारी जमादार यांना शिवीगाळ केली. तसेच साळमुख चौकातील माझ्या भावाच्या हॉटेलची तपासणी का केली, असा जाब देखील विचारला आणि त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर पोलिसाला धमकावत जातीवाचक शिवीगाळ केली.

- Advertisement -

शिवीगाळ झाल्यानंतर जाधव याने ब्लेडने जमादार यांच्यावर वार केला. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सरकारी गणवेशही फाडला. नंतर त्याने स्वतःच्या मोटारीतून पेट्रोल भरलेली बाटली काढून, आता तुला जिवंत सोडत नाही, असे पुन्हा धमकावत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले मात्र सोबतच्या पोलीस मित्रासह होमगार्ड व इतरांनी जाधव यास रोखले. हा प्रकार घडल्याचे समजताच मळोली गावात पोलिसाची टीम धावून आली आणि पोलिसांनी आरोपी अरुणसिंह जाधव याला अटक केली आहे.


CoronaVirus: मास्क न लावल्यास ‘या’ देशात तब्बल ८ लाख रुपये दंड!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -