घरदेश-विदेशCorona: रिपोर्ट येण्याआधीच पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला दिला डिस्चार्ज!

Corona: रिपोर्ट येण्याआधीच पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला दिला डिस्चार्ज!

Subscribe

या प्रकारानंतर वैद्यकीय विभागातील कर्मचारी एकमेकांवर आरोप करत असून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी देखील केली आहेत

जगभरासह देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होताना दिसतोय. कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढताना दिसतोय. कोरोनाची लक्षण आढळल्यास त्वरीत तपासणी देखील केली जात आहे. अशा वेळी रूग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्यावर योग्य उपचार देखील करण्यात येत आहे, मात्र कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा भोंगळकारभार समोर आला आहे.

असा घडला प्रकार

कानपूरच्या सरसौल येथे एका विद्यार्थ्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आला. मात्र त्याच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाची खडबडून जागे झाले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा एकमेकांवर आरोप

या प्रकारानंतर वैद्यकीय विभागातील कर्मचारी एकमेकांवर आरोप करत असून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी देखील केली आहेत. 27 एप्रिल रोजी मदरशा विद्यार्थ्यांचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र विद्यार्थ्याच्या संपर्कात येताच एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली. यावेळी सीएचसी अधीक्षक सीएल वर्मा यांना या प्रकाराची माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने परत पाठवण्यात आली आणि मदरशामधून या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मदरशाला पोचल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णवाहिका पाठवून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकारी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, रुग्णाचे रिपोर्ट न पाहता त्याला कसा डिस्चार्ज देण्यात आला याची चौकशी केली जात आहे.या प्रकरणाच्या तपासणीनंतर कारवाई केली जाईल, असे देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

CoronaVirus: मास्क न लावल्यास ‘या’ देशात तब्बल ८ लाख रुपये दंड!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -