घरCORONA UPDATEcoronavirus : कोरोना रुग्णाला १ मिनिटात किती लिटर ऑक्सिजन लागतो? जाणून घ्या

coronavirus : कोरोना रुग्णाला १ मिनिटात किती लिटर ऑक्सिजन लागतो? जाणून घ्या

Subscribe

देशात कोरोना महामारीचा दुसऱ्या लाटेविरोधात लढा सुरु आहे. कोरोना संसर्गा वाढतच असल्याने परिस्थिती दिवसागणिक कठीण होतयं. याचा ताण साहजिकच आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासतेय. ऑक्सिजन अभावी अथवा जास्त ऑक्सिजनमुळे रुग्ण दगावल्याचाही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला किती प्रमाणात ऑक्सिजन द्याचे किंवा किती वेळ द्यायचा हा निर्णय डॉक्टरांचा असतो.  कोरोनाची लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णाला काही तास किंवा दिवसभर ऑक्सिजन दिला जातो. सध्या रुग्णाला मेडिकल ऑक्सिजनची अधिक गरज भासतेय.

दरम्यान राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणाऱ्या ऑक्सिजनवर प्रक्रिया करत ते ९३ टक्क्याहून अधिक शुद्ध करुन रुग्णास वापरले जात आहे. कोरोनाचा अतिगंभीर लक्षणांचा सामान करणाऱ्या रुग्णांना नैसर्गिकरित्या ऑक्सिजन घेताना अडचणी येतात, त्यामुळे त्यांना मेडिकल ऑक्सिजनची गरज लागते. दरम्यान प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाचा आजाराच्या तीव्रतेनुसार त्याची ऑक्सिजनची मागणी बदलते. सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. तर बऱ्यात रुग्णांना हाय फ्लोव नसल कॅनूला (एच एफ एन सी) मशीनची गरज लागते.

- Advertisement -

कोरोनाला रुग्णाला ऑक्सिजनच गरज का भासते? 

दरम्यान जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ऑक्सिजन गरजेचाच आहे. यात सरासरी विचार केला असता. एका मिनिटात एक व्यक्ती सुमारे ७ ते ८ लिटर हवा शरीरात घेतो आणि सोडतो. त्यामुळे दररोज एका व्यक्तीला सुमारे ११,००० लीटर ऑक्सिजन लागते. दरम्यान हवेत २१ टक्के ऑक्सिजन आपण घेतो. हा ऑक्सिजन तोंड आणि नाकेवाटे फुफ्फुसांना पुरवला जातो. परंतु एखाद्या रुग्णाला फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्यास अडचणी आल्याने श्वास घेण्यासही जमत नाही परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते. यावेळी रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टची गरज भासते.

ऑक्सिजनची गरज केव्हा लागते? 

सामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. दरम्यान रक्तातील ऑक्सिजन ९० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. यावेळी मेडिकल ऑक्सिजन मोठ्याप्रमाणात गरज भासते. जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. या सहा मिनिटे चालण्याचा चाचणीवरूनही ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती सहा मिनिटांऐवजी तीन मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात. यावेळी एखाद्या रुग्णास श्वास घेण्यास त्रास झाल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल ऑक्सिजन रुग्णाला दिले जाते.

- Advertisement -

कोरोना रुग्णाला दरदिवसात किती ऑक्सिजन लागते?  

रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि न्यूमोनियाची तीव्रता, इतर लक्षणांमधील गुंतागुंत या आधारे ऑक्सिजनचे प्रमाण किती द्यायचे हे डॉक्टर ठरवतात. कारण प्रत्येक कोरोना रुग्णांची लक्षणे आणि आजाराची तीव्रता सारखी नसते. दरम्यान काही रुग्णांना १ मिनिटात एक ते दोन लिटर ऑक्सिजनची गरज लागू शकते किंवा लक्षणे गंभीर असल्याने श्वास घेण्यास त्रास झाला तर हेच ऑक्सिजनचे प्रमाण प्रति मिनिट ३ ते ४ लिटरही लागू शकते. ९५च्या खाली ऑक्सिजन असलेल्या रुग्णांनाही त्याची जशी गरज असते तसेच ५० ते ७० लिटर प्रति मिनिट इतकी गरज असलेल्या व्यक्तींना ऑक्सिजनही गरज भासू शकते. त्यामुळे जोपर्यंत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज लागू शकते. दरम्यान हाय फ्लो नसल कॅनूला (एचएनसी) मशीवर असणाऱ्या रुग्णाला प्रति मिनिट ६० लिटर किंवा तासाला ३६०० लिटर ऑक्सिजन लागू शकते. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टर सांगतात, ऑक्सिजनची आवश्यकता दररोज प्रति दिन ८६००० लिटरपर्यंत जाऊ शकते.

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरने ऑक्सिजन कसा दिला जातो?

हाय फ्लो नसल कॅनूला (एचएनसी) मशीवर असणाऱ्या रुग्णांसाठी एक सामान्य ऑक्सिजन सिलेंडर सुमारे चार तासांचा असतो. परंतु हे ऑक्सिजन सिलेंडर रिफलिंग सेंटर शहराबाहेर असल्याने ते रिफिल होऊन येईपर्यंत बराच वेळ जातो परिणामी त्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा कमरता भासते. यावेळी ऑक्सिजन काँसंट्रेटरची मोठी गरज भासते.
राज्यात ऑक्सिजन काँसंट्रेटरचा पुरवठा कमी आहे. हे ऑक्सिजन काँसंट्रेटर्स एक साधे उपकरण आहे. ज्या माध्यमातून सभोवतालची हवा शोषून घेत त्या हवेला फिल्टर करून ऑक्सिजनची पातळी वाढवली जाते आणि नायट्रोजन बाहेर फेकला जातो. शरीराला आवश्यक ऑक्सिजन पुरवठा ज्याप्रकारे टँक किंवा सिलेंडर्सद्वारे केला जातो. त्याचप्रकारे तो ऑक्सिजन काँसंट्रेटर्समधूनही केला जाऊ शकतो.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -