घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: दिलासादायक! १० लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर केली मात!

CoronaVirus: दिलासादायक! १० लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर केली मात!

Subscribe

एकीकडे जगात कोरोना लागण झालेल्या रुग्णांची आकडा वाढत असताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कोरोना मात करणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हजारोंच्या संख्येने दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या भीतीच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गुरुवार संपूर्ण जगात या जीवघेण्या कोरोना व्हायरसापासून मुक्त झालेल्यांचा आकडा १० लाखांहून अधिक झाला आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १० लाख १४ हजार ७६१ लोकांनी कोरोना व्हायरसवर मात करून बरे झाले आहेत. या आकडेवारीमुळे असे कळते की, कोरोनामुळे फक्त मृत्यू होत नसून त्यावर मात करणे देखील शक्य आहे.

जगभरात आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. १० लाखांहून अधिक जणांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. तर या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे ६० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत सव्वा लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. अमेरिके पाठोपाठ स्पेन, जर्मनीमध्ये कोरोना रुग्ण बरे होणाची संख्या एक लाखाहून अधिक आहे.

आतापर्यंत भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३५ हजारवर पोहोचला आहे. त्यापैकी नऊ हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्या लोकांच्या आकडेवारीची सरासरी चांगली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: चीनसाठी WHO ही जनसंपर्क संस्था, लाज वाटली पाहिजे स्वतःची – ट्रम्प


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -