घरदेश-विदेशआजपासून कोरोना लसीकरणापूर्वी 'या' चार राज्यांत होणार ड्राय रन

आजपासून कोरोना लसीकरणापूर्वी ‘या’ चार राज्यांत होणार ड्राय रन

Subscribe

२८ आणि २९ डिसेंबर रोजी कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थापनाचा सराव देशातील ४ राज्यांत करण्यात येणार

कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. लसीकरणात व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची आहे आणि त्यामुळे देशभरातील २,३६० प्रशिक्षण सत्रांमधून सात हजारांहून अधिक प्रशिक्षक जिल्हा पातळीवर प्रशिक्षित करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे. आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थापनाचा सराव देशातील ४ राज्यांत करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

लसीकरणात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, लस देणारे, लस देणाऱ्यांची पर्यायी चेन, कोल्ड चेन हाताळणी करणारे, सुपरवायझर, डेटा व्यवस्थापक, आशा समन्वयक आणि इतर विविध पातळीवर लसीकरण प्रक्रियेचा भाग असलेल्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी सत्रे सुरू आहेत.

- Advertisement -

आज पहिल्या दिवशी लसीकरणासाठी लागणारी पूर्वतयारी केली जाईल. यासाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील. यात Co-Win अॅपवरील नोंदणी, लसीकरण मोहिम राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारीचं वाटप, ब्लॉक स्तरावरील लस वाहतुकीच्या साधनांची तयारी अशा बाबींचा समावेश असेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या प्रत्यक्ष लसीकरण कसे केले जाईल याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.


Corona Vaccine: नव्या कोरोना स्ट्रेनविरोधात Astrazenecaची लस करू शकते काम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -