घरताज्या घडामोडीगुडन्यूज! कोरोना लसीला वर्षाच्या अखेरीस मिळणार मंजूरी - AIIMS

गुडन्यूज! कोरोना लसीला वर्षाच्या अखेरीस मिळणार मंजूरी – AIIMS

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव कायम आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलीकडेच काही कंपन्यांची लस ९० टक्के प्रभावी असल्याचे समोर येत आहे. आता भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी वर्षाच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मंजूरी दिली जाऊ शकते, अशी माहिती आज (गुरुवारी) दिल्लीचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.

अलीकडेच अमेरिकेच्या फायझर कंपनीने विकसित केलेली कोरोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला असून ब्रिटनकडून फायझरच्या लसीला मंजूरी दिली आहे. ब्रिटन कोरोना लसीला मंजूरी देणारा पहिला देश ठरला आहे. ब्रिटननंतर रशियातही लसीकण करण्याची मोहीम सुरू केल्याचे समोर आले आहे. दरम्यान भारतात देखील अनेक कोरोना लसीवर काम सुरू आहे. अनेक भारतीय लसींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. ज्यात ऑक्सफोर्ड-एक्स्ट्राजेनिका आणि भारत बायोटेकची लस आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिस्ट्यमध्ये तयार केली जाणारी ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. गेल्या आठवड्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोविशिल्ड लसीचे डोस ५०० रुपयांत मिळणार आहे आणि येत्या २०२१च्या तिमाहीत भारतात कोरोना लस उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

- Advertisement -

या लसीबाबत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘सध्या डेटानुसार भारतीय लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. तसेच लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही लस सध्या ७० ते ८० हजार स्वयंसेवकांना दिली आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही आहेत.’


हेही वाचा – ब्रिटननंतर रशियातही पुढील आठवड्यात देणार कोरोना लस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -