घरदेश-विदेशWHO ने जारी केल्या फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स

WHO ने जारी केल्या फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स

Subscribe

ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असेल त्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रावर प्रत्येकाने मास्क घालणं अनिवार्य

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना चेहऱ्यावर मास्क लावणे, सतत साबणाने स्वच्छ हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे बंधनकारक आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असेल त्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रावर प्रत्येकाने मास्क घालणं अनिवार्य केलं आहे.

यापूर्वी देखील जूनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने फेस मास्कसाठी गाईडलाइन्स जारी केल्या होत्या, यावेळी त्यांनी सांगितले होते की, ‘सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला फॅब्रिक मास्कचा वापर करणं बंधनकारक करा. ज्या भागांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फेस मास्कचा वापर करा.’

- Advertisement -

अशा आहेत WHO च्या नव्या गाईडलाईन्स

  • जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत
  • ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे १२ वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा.
  • दुकानं, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे फेस मास्कचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे.
  • जिथे एअर एक्झॉस्टची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा.
  • एअर एक्झॉस्टची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गर्दी असेल तर फेस मास्क वापरणं आवश्यक असणार आहे.

तसेच, गाइडलाइन्समध्ये सांगितल्यानुसार हेल्थ केअर वर्कर्स, जे कोरोना रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी N95 मास्कचा वापर करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे की, शारीरिक परिश्रमाची कामं करताना लोकांनी मास्क वापरू नये.


मसाल्यांचा बादशाह ‘MDH’ कंपनीच्या मालकाचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -