घरदेश-विदेशकोरोना पॉझिटिव्ह सांताने दिले गिफ्ट; १५७ जण संक्रमित, १८ जणांचा मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह सांताने दिले गिफ्ट; १५७ जण संक्रमित, १८ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच हा सांताक्लॉज सुपरप्रेडर ठरला.

एका केअर होममध्ये कोरोना व्हाय़रसची लागण झालेल्या सांताक्लॉजच्या येण्याने तेथे राहणाऱ्या १२१ लोकांसह ३६ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी कोरोनाचा संसर्ग झालेल्या १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही घटना बेल्जियम येथील असल्याचे सांगितले जात आहे. डेली मेलच्या अहवालानुसार दोन आठवड्यांपूर्वी सांताक्लॉज आपल्या काही सहकाऱ्यांसह बेल्जियमच्या अँटवर्प येथील केअर होममध्ये गेला होता. दरम्यान, कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच हा सांताक्लॉज सुपरप्रेडर ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ डिसेंबर रोजी केअर होममध्ये राहणाऱ्या पाच लोकांचा मृत्यू झाला तर आणखी एका व्यक्तीला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अहवालानुसार केअर होममध्ये आल्यानंतर तीन दिवसांनंतर स्वत: सांताक्लॉज पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हे समजल्यानंतर केअर होममध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक महापौर विम कीअर्स यांनी अशी माहिती दिली की, केअर होममध्ये राहणारे १५७ जण कोरोना संक्रमित आढळले तर १८ जणांचा मृत्यू झाला, ही धक्कादायक बाब आहे. पुढील १० दिवस चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, बेल्जियममधील अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञ मार्क व्हॅन रॅन्स्ट यांनी म्हटले की, कोरोनाची लागण झालेल्या संताक्लॉजमुळे मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले असावेत, असा संशय आहे. तर केअर होममधील असणारी व्हेंटिलेशन व्यवस्था योग्य नसल्याने देखील इतक्या लोकांचा जीव धोक्यात आला असावा.

ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर देशभरातील सर्वच नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर आता आणखी एका देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा नवा तिसरा स्ट्रेन नायजेरियातील नागरिकांमध्ये आढळून आला आहे. तर आफ्रिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या स्ट्रेनसंदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम यावर संशोधन करत आहे. दरम्यान बुधवारी ब्रिटनमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून परतलेल्या दोन प्रवाशांमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळून आला आहे.


नवे वर्ष आव्हानाचे, बाबा वेंगाची भविष्यवाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -