घरदेश-विदेशमेगा ख्रिसमस गिफ्ट : ग्राहकाने दिली चार लाखांची टीप

मेगा ख्रिसमस गिफ्ट : ग्राहकाने दिली चार लाखांची टीप

Subscribe

सगळ्या जगभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीवर कोरोनाच्या महामारीनंतर आर्थिक संकट आले. कोरोनानंतरच्या हॉटेल आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीवर आलेल्या निर्बंधामुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेक ठिकाणी व्यवसाय डबघाईला आले, कर्मचाऱ्यांची मोठी कपात झाली. पण अशा सगळ्या परिस्थितीतच एन नाताळ सणाच्या तोंडावर एका ग्राहकाने रेस्टॉरंटमधील स्टाफला दिलेली टीप हा सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका ग्राहकाने रेस्टॉरंटमधील जवळपास २८ जणांच्या स्टाफला जवळपास ५६०० डॉलर्स ( ४ लाख) रूपयांची टीप देऊन मोठा सुखद धक्का दिला. महत्वाचे म्हणजे जे ऑफड्युटी आहेत अशा ग्राहकांनाही प्रत्येकी २०० डॉलर्सची टीप द्यावी असे त्या ग्राहकाने त्या बिलावर नमुद केले आहे. रेस्टॉरंट स्टाफच्या कुटुंबीयांसाठी आणि ख्रिसमस सुट्टीतील खरेदीसाठी ही टीप देत असल्याचे त्या ग्राहकाने रेस्टॉरंट स्टाफला सांगितले. गेल्या अनेक महिन्यात रेस्टॉरंट उद्योगावर आलेल्या संकटानंतर अशा प्रकारचा सुखद अनुभव आल्यानंतर अनेक स्टाफ मेंबर्सच्या डोळ्यात पाणी आले. अनेकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर आपले अश्रू आवरता आले नाहीत. अमेरिकेतील टोलेडो, ओहिओ येथील सौक मेडिटेरॅनिअन किचन एण्ड बार येथे अशा प्रकारचा अनुभव स्टाफला आला आहे.

रेस्टॉरंटच्या मालकानेही याबाबतची पोस्ट फेसबुकवर शेअर करत नमुद केले आहे की, एखाद्या आयुष्यात काहीतरी चांगल घडवण्यासाठी आपण निमित्त होणं यासारखी गोष्ट नाही. पण या ग्राहकाने सर्व स्टाफ मेंबर्सला दिलेल्या सुखद आनंदामुळे खरच यासारखी दयेची आणखी कोणतीही गोष्ट नसावी असे त्याने आपल्या पोस्ट म्हटले आहे. यंदाचा डिसेंबर हा सामान्य नाही. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ग्राहकांसाठी अतिरिक्त वेळ सेवा देत रेस्टॉरंटचा सर्वच स्टाफ आपल्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी मेहनत घेत असतो. त्या पैशामधून अनेकजण हे आपल्या कुटुंबीयांना गिफ्ट्स खरेदी करतात. यंदा मात्र कोरोनामुळे सगळ्यांच्या आर्थिक बचतीवर संकट आले होते. त्यामधून या ग्राहकाने स्टाफसाठी दाखवलेल्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत असे ग्राहकाने नमुद केले आहे. यासारख्या आनंदासाठी फक्त धन्यवाद म्हणण योग्य ठरणार नाही.

- Advertisement -

“Be the reason someone believes in the goodness of people.”

This really happened. Last night one of our guests left a…

Posted by Souk Mediterranean Kitchen & Bar on Sunday, December 13, 2020

 

- Advertisement -

यंदा कोरोनामुळे ख्रिसमस पार्ट्यांवर बंधन आली आहेत. अशातच स्टाफसाठी ही मोठी आर्थिक मदत करताना त्या ग्राहकाने आपली ओळख गुप्त ठेवावी अशीही मागणी केली आहे. मला ही पोस्ट शेअर करताना आणि ते सगळ आठवतानाही अश्रू अनावर होत आहेत असा अनुभव रेस्टॉरंट मालकाने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. आपण जेव्हा रेस्टॉरंटसाठी काम करतो तेव्हा रेस्टॉरंटमधील स्टाफ हा आपले कुटुंब असतो. आपण अनेकदा त्यांच्या सुख – दुख:त सहभागी असतो. यासारख्या टीपमुळे आम्हाला खूपच चांगल वाटत असून एक आशेचा किरण मिळाल्यासारखे आम्हाला वाटत आहे. कुणीही २८ जणांसाठी एवढ अशा कोरोना महामारीच्या आर्थिक संकटात करत नसते. आम्हीही ऑक्टोबरमध्ये सर्व आर्थिक संकटात आमचे रेस्टॉरंट सुरू केले. रेस्टॉरंट सुरू रहाव म्हणून जे काही करता येईल ते सगळं आतापर्यंत केले आहे असे त्या मालकाने आपल्या पोस्टमध्ये नमुद केले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -