घरदेश-विदेशCyber Attacks : जगभरातील सायबर गुन्हेगारांनी भारताला केले लक्ष्य

Cyber Attacks : जगभरातील सायबर गुन्हेगारांनी भारताला केले लक्ष्य

Subscribe

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे हल्ली तंत्रज्ञान ही देखील माणसाची मूलभूत गरज बनली आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केलेली पाहायला मिळत आहे. परंतु, यामुळे तंत्रज्ञानाच्या अर्थात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक लक्ष्य हे भारताला केले असल्याने सायबर गुन्हेगारीच्या सर्वाधिक तक्रारी या भारतातून समोर आलेल्या आहेत. ज्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक झालेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असल्याची माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. (Cyber ​​Attacks: India is targeted by cyber criminals from around the world)

हेही वाचा… CBI मधील विशिष्ट आणि गुणवंत सेवा पदकं जाहीर; 31 अधिकाऱ्यांमध्ये 4 मुंबईकर

- Advertisement -

सायबर सिक्युरिटी फर्म असणाऱ्या चेक पॉइंटकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, आशिया-पॅसिफिक भागात तैवान या देशावर 2023 साली सर्वाधिक सायबर हल्ले झाले. त्यानंतर भारतावर सर्वाधिक सायबर हल्ले झाल्याने भारत हा सर्वाधिक सायबर हल्ले झालेल्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2022 च्या तुलनेमध्ये भारतात 2023 मध्ये सर्वात जास्त हल्ले झाले असून या हल्ल्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरातील प्रत्येक संस्थेवर आठवड्याला सरासरी 1 हजार 158 सायबर हल्ले करण्यात आल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म असणाऱ्या चेक पॉइंटने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये भारतातील प्रत्येक संस्थेवर दर आठवड्याला सरासरी 2 हजार 138 सायबर हल्ले झाले होते. 2022 च्या तुलनेत ही संख्या 15 टक्क्यांनी अधिक होती. तैवानमध्ये ही संख्या आठवड्याला 3 हजार 050 हल्ले एवढी होती. तर, भारतातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले. अर्थात, 2022 च्या तुलनेत यामध्ये 12 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. त्यानंतर रिटेल आणि होलसेल सेक्टरवरील हल्ल्यांमध्ये 22 टक्के वाढ झाली असल्याने हे सेक्टर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हेल्थकेअर सेक्टरवरील हल्ल्यात देखील तीन टक्क्यांची वाढ दिसून आल्याची माहिती चेक पॉइंटच्या अहवालातून समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -