घरदेश-विदेश'त्या' पत्रकारांना मारायचे नव्हते,नक्षलवाद्यांनी दिले स्पष्टीकरण

‘त्या’ पत्रकारांना मारायचे नव्हते,नक्षलवाद्यांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

30 ऑक्टोबर रोजी दूरदर्शनची तीन जणांची टीम निवडणुकांच्या कव्हरेजसाठी गेली होती. त्यांच्यासोबत दोन सुरक्षा कर्मचारी होते. त्यांची टीम नीलवाया जंगलात आल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या कव्हरेजसाठी दूरदर्शनची एक टीम ३० ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमध्ये गेली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या २ कॅमेरामॅनसह, २ सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर आता नक्षवाद्यांनी या घटनेची स्पष्टोक्ती दिली आहे. यात प्रसारमाध्यमांच्या माणसांना लक्ष्य करण्याचा आमचा काही उद्देश नसल्याचे त्यांनी एका परिपत्रकातून सांगितले आहे.

पाहा- नक्षली हल्ल्यात बचावलेल्या कॅमेरामनने आईसाठी केला व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड

नेमकं काय आहे या पत्रात?

नक्षलवाद्यांनी दिलेल्या त्यांच्या स्पष्टीकरणात पत्रकारांना मारण्याचा कोणताच हेतू नव्हता.डीडीचे कॅमेरामॅन अच्युतानंद साहू यांचा मृत्यू हा अपघाताने झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यामुळए त्यांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला त्यात त्यांचा मृत्यू झाला असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. पण यावर पोलिसांनी कॅमेरा का पळवला असा प्रश्न नक्षलवादयांना करण्यात आला. त्यावेळी त्यात रेकॉर्ड झालेल्या पुराव्यामुळे तो पळवण्यात आल्याचे सांगितले. पण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शहीद कॅमेरामॅन यांच्या शरीरावरील घाव पाहिल्यानंतर हा हल्ला अपघात नव्हता तर जाणून बुजून त्यांना मारण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

वाचा- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

नेमकं प्रकरण काय?

30 ऑक्टोबर रोजी दूरदर्शनची तीन जणांची टीम निवडणुकांच्या कव्हरेजसाठी गेली होती. त्यांच्यासोबत दोन सुरक्षा कर्मचारी होते. त्यांची टीम नीलवाया जंगलात आल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात १ एसआईएस जवान, २ सुरक्षारक्षक आणि एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. तर आणखी २ मीडिया कर्मचारी जखमी झाले. विशेष म्हणजे घटनेच्या काहीच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास नसल्याचे सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -