लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या दोन विमानांना धमकीचे फोन आले आहेत. या धमकी नंतर दिल्ली पोलिसांनी विमानतळावर अलर्ट जारी केला आहे. हा धमकीचा फोन सिख फॉर जस्टिस नावाच्या संघटनेकडून आला असल्याची माहिती आहे. ५ नोव्हेंबरला दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या दोन विमानांना लंडनला पोहचू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहेत. ही माहिती एका वृत्तसंस्थेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. या धमकीच्या फोननंतर दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान कमांडो फोर्सचे आतंकवादी गुरूपतवंत सिंह पन्नू हे अनेक जणांना वॉइस कॉल करून धमक्या देत आहेत. यावेळी त्यांनी ५ नोव्हेंबरला लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या दोन विमानांना लंडनला पोहचू देणार नाही, अशी धमकी दिली आहे.
सिख फॉर जस्टिस म्हणजे काय?
पंजाबमध्ये स्वंतत्र देश स्थापन करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ही संस्था खलिस्तानच्या मुद्यावरून लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा प्रयत्न करत असते. इंटरनेटच्या विश्वात या संस्थेचे २ लाख फॉलोवर्स आहेत. या संस्थेच्या सदस्यांना दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी बऱ्याचदा पकडले आहे. लोकांना वेगवेगळ्या फोन नंबर वरून धमकीचे फोन करत असतात.
हेही वाचा – महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही CBI ला ‘नो एंट्री’!