घरताज्या घडामोडीचोरट्यांची आंतरराज्य लपाछपी; दिल्लीच्या चोरांची नाशकात चोरी, इंदोरमधून आठजणांना अटक

चोरट्यांची आंतरराज्य लपाछपी; दिल्लीच्या चोरांची नाशकात चोरी, इंदोरमधून आठजणांना अटक

Subscribe

लॉकडाऊन शिथील होताच चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊननंतर पुणे, मुंबई, ठाणे, इंदोर, सुरत, अहमदाबाद येथे बॅग लिफ्टींग करणार्‍या आठ चोरट्यांना नाशिक पोलिसांनी इंदोर (मध्यप्रदेश) येथे सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कार, सात मोबाईल, दोन सिमकार्ड, दोन मिरची लिक्वीड स्प्रे., एक रबरी गलोर, ५० छर्‍या व ७० हजार रुपयांची रोकड जप्त केली.

कांगत्रम सैल्ली दुराई (सर्वजण रा.दिल्ली), पवन मोहन लाल, आकाश मोहन लाल, मनतोश अली मुत्तु, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहील सुरेश अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

- Advertisement -

५ ऑक्टोबर रोजी रामचंद्र नामदेव जाधव (रा. बोधलेनगर, नाशिकरोड) कारने एमजी रोडवरील कुलकर्णी पावभाजी दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी अनोळखी एकजण त्यांच्या जवळ आला. तुमच्या गाडीचे ऑईल पडले आहे, असे त्याने सांगितले. सुरुवातीला जाधव यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर दुसरा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्यानेही गाडीचे ऑईल लिकेज होत असल्याचे सांगितले. जाधव हे ऑईल पाहण्यासाठी कारमधून बाहेर आले असता चालकाच्या शिटमागे ठेवलेल्या एक लाख रुपयांच्या दोन बॅगा चोरट्याने लंपास केल्या. याप्रकरणी जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी येवून पाहणी करत समांतर तपास सुरु केला. पोलिसांना आरोपी दिल्लीतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. चोरट्यांनी १ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये चोरी करुन ते दिल्लीतून निघून इंदोरमध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक इंदोरला रवाना झाले. बंजारी, पो.प्रिथमपूर (ता.महू, जि.इंदोर) येथील हॉटेल द ग्रीन अ‍ॅपलजवळ आठजणांना कारसह (एचआर २६-बीआर ९०४४) पथकाने अटक केली. पोलिसांनी विचारपूस केली असता महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्लीमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -