Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अत्याचार पीडितेला भेटण्यास गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना रोखले; न्यायासाठी थेट गृहमंत्र्याना...

अत्याचार पीडितेला भेटण्यास गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना रोखले; न्यायासाठी थेट गृहमंत्र्याना पत्र

Subscribe

दिल्लीच्या महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते.

नवी दिल्ली : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील पीडितेस भेटण्यास गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल याना भेटू दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला असून, या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीट करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. (Delhi Commission for Women Chairperson who went to meet rape victim stopped Direct letter to Home Minister for justice)

दिल्लीच्या महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या कृत्यात त्याची बायकोही त्याला मदत करत होती. दरम्यान याप्रकरणाचा भांडाफोड झाला असून, त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या अल्पवयीन मुलीला दाखल करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये भेटण्यास सोमवारी गेल्या असता त्यांना त्या पीडितेस भेटू दिले नाही. त्यामुळे त्या उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, दिल्ली पोलिस गुंडगिरी करत आहेत. ते मला ना मुलीला भेटू देत आहेत ना तिच्या आईला. यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल मंगळवारी रुग्णालयातून निघून गेल्या.

- Advertisement -

हेही वाचा : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या लक्षद्वीपच्या खासदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश

आयोगाने बजावली पोलिसांना नोटीस

सोमवारी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि दिल्ली पोलिसांमध्ये महिला आणि बाल विकास विभागाचे उपसंचालक प्रेमोदय खाका यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हाणामारी झाली. यावेळी आयोग आणि दिल्ली पोलिसांनी एकमेकांना ताकतच दाखवली. गुन्हा नोंदवून आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक न केल्याने आयोगाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : लुना-25 क्रॅश झाल्याचे कारण आले समोर; रशिया म्हणते – अपयशातून जे शिकलो होतो ते विसरलो…

अमित शहांकडे केली न्यायाची मागणी

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वातील मालीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत मागणी केली की, पीडितेला भेटू दिले जावे, कारण, भेटल्यानंतर आम्ही त्या पीडितेची अवस्था समजून घेऊ आणि तिला मदत करू शकू, सोबतच पीडितेवर उपचार हे एम्स रुग्णालयात करण्यात यावे किंवा एम्स रुग्णालयाची टीम त्या पीडितेवर उपचार करेल, तर आरोपीला अद्याप का अटक करण्यात आली नाही याप्रकरणाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

- Advertisment -