घरक्राइमDelhi Crime News: आश्चर्यकारक! दिल्लीतील चोरांची हिंमत पाहा; पठ्ठ्याने थेट सरकारी रुग्णवाहिकाच...

Delhi Crime News: आश्चर्यकारक! दिल्लीतील चोरांची हिंमत पाहा; पठ्ठ्याने थेट सरकारी रुग्णवाहिकाच चोरली

Subscribe

एका चोराने सेंट्रलाइज्ड अॅक्सिडेंट अँड ट्रॉमा सर्व्हिसेस (सीएटीएस) ची रुग्णवाहिकाच पळवून नेली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत दररोज छोट्या-मोठ्या लक्झरी वाहनांच्या चोरीच्या घटना समोर येत आहेत. यावेळी एका हुशार चोराने सेंट्रलाइज्ड अॅक्सिडेंट अँड ट्रॉमा सर्व्हिसेस (सीएटीएस) ची रुग्णवाहिकाच पळवून नेली आहे. (Delhi Crime News Amazing Behold the courage of thieves in Delhi thief directly stole the government ambulance)

रुग्णवाहिकेचा जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसांना बोलावून या संदर्भात माहिती देण्यात आली. मधु विहार पोलीस ठाण्यात तब्बल 22 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच खिचडीपूर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ रुग्णवाहिका उभी असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मास्क लावलेला माणूस दिसत होता. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, जेणेकरून रुग्णवाहिका चोरी आणि जीपीएस तोडण्यामागील हेतू उघड होऊ शकेल.

- Advertisement -

मोहित कुमार वर्मा (27) हा कुटुंबासह खिचडीपूरच्या संक्रमण शिबिरात राहतो. तो व्यवसायाने ड्रायव्हर आहे, जो सध्या दिल्ली सरकारची CATS रुग्णवाहिका चालवतो. त्याने पोलिसांना सांगितले की, 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्याने आपली रुग्णवाहिका मांडवली येथील जोशी कॉलनी येथील कम्युनिटी सेंटरच्या लोकेशन पॉईंटवर उभी केली होती. पॅरामेडिकल कर्मचारी मधुसूदन (25) हाही त्याच्यासोबत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही रुग्णवाहिकेला कुलूप लावून जेवायला बाहेर पडले. साडेपाचच्या सुमारास ते परतले तेव्हा तिथून रुग्णवाहिका गायब होती.

मोहित कुमार वर्मा याने सांगितले की, मी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आणि आजूबाजूला पाहिले तर मला कुठेही रुग्णवाहिका दिसली नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर जीपीएसद्वारे लोकेशन ट्रॅक करता यावे, यासाठी लोकेशन प्रभारी यांना कॉल केला. पण जीपीएस काम करत नव्हते. 15 जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले. यानंतर दुपारी 2 वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे दोन तासांनंतर खिचडीपूर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ रुग्णवाहिका उभी असल्याची माहिती मिळाली. चोरट्याने रुग्णवाहिकेचा जीपीएस तोडल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. कॅमेऱ्यात चोर दिसत होता. त्याने डोक्यावर टोपी आणि तोंडाला मफलर घातले होते. चोराने 4:42 वाजता रुग्णवाहिका चोरली, ती 4:46 वाजता सोडून दिल्याचे फुटेजमध्ये उघड झाले आहे.

- Advertisement -

(हेही वाचा  Action against Suraj Chavan-Rajan Salvi : सुषमा अंधारे संतापल्या; भाजपावर केला प्रश्नांचा भडीमार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -