घरमहाराष्ट्रSushama Andhare : माझ्या बाईपणावर...; सोमय्यांचा व्हिडिओ स्पेशालिस्ट उल्लेख करत सुषमा अंधारेंचे...

Sushama Andhare : माझ्या बाईपणावर…; सोमय्यांचा व्हिडिओ स्पेशालिस्ट उल्लेख करत सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे, तर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला असून एसीबीकडून या प्रकरणाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईनंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर निशाणा साधला होता. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. (Some speak of my womanhood Criticism by Sushma Andhare mentioning video specialist Kirit Somaiya)

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

- Advertisement -

सुषमा अंधारे म्हणाल्या की, कुटे ग्रुपचे मालक सुरेश कुटे यांच्यावर बीडमध्ये धाड पडली होती. धाड पडल्यानंतर सुरेश कुटे यांनी पाचव्या दिवशी बावनकुळेंच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली. यावर व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या का बोलत नाहीत? भावना गवळी, यशवंत जाधव हे जर निर्दोष असतील तर यातील किती जणांनी अब्रू नुकसानाची दावा केला? किंवा माफी मागण्याची मागणी केली आहे? असे सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – Action against Suraj Chavan-Rajan Salvi : सुषमा अंधारे संतापल्या; भाजपावर केला प्रश्नांचा भडीमार

- Advertisement -

माझ्या बाईपणावर काही बोलघेवडे बोलतात

किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांच्या दौऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत का? माझी पाटी कोरी आहे, नाही तर त्यांनी मला सोडलं नसतं, अशी भीती व्यक्त करत त्या म्हणाल्या की, माझ्या बाईपणावर काही बोलघेवडे बोलत आहेत. पण संजय राऊत हे सत्याचे वाली आहेत. तुमच्या सारखे व्हिडीयो त्यांनी केलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही एक निवडणूक ईव्हीएमशिवाय घेऊन दाखवा, मग लोक तुम्हाला तुमची लायकी दाखवतील, असा भाजपाला इशारा देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आता ईव्हीएमवर विश्वास ठेवून फायदा नाही. कारण खाली बसून अंतराळ यान हाताळले जाते. त्यामुळे ईव्हीएम काय चीज आहे? इतर देशात ईव्हीएम बंद झाली आहेत, अशीही माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -