घरमनोरंजन'सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’ 26 फेब्रुवारी रोजी होणार प्रसारित

‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’ 26 फेब्रुवारी रोजी होणार प्रसारित

Subscribe

गौतम बुद्धांच्या अमर दृष्टीने अगणित पिढ्यांना दिशा दिली आहे व काळाच्या चाकोरीवर मात करून तो संदेश आजही तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे. परंतु, गौतम बुद्धांचे शेवटचे दिवस व बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वाचे असलेले त्यांचे अवशेष ह्यांच्याबद्दल अनेक प्राचीन दंतकथा आहेत. ह्या अवशेषांभोवती असलेले गूढ उलगडण्यासाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी सीक्रेट फ्रँचायजीच्या तिस-या भागासह परत आले आहे – ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स,’ डिस्कव्हरी+ वर 22 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होईल व डिस्कव्हरी चॅनलवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होईल. नीरज पांडे व फ्रायडे स्टोरीटेलर्सची निर्मिती असलेल्या व वैविध्यपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व पद्मश्री पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी ह्या डॉक्युमेंटरीला हॉस्ट करेल व त्यामध्ये दर्शकांना बुद्धांच्या अवशेषांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल नवीन माहिती मिळेल.

सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्सबद्दल बोलताना कलाकार मनोज वाजपेयी ह्यांनी म्हंटले, “सीक्रेटस फ्रँचायजीसाठी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसोबत माझी भागीदारी पुढे नेताना मला अतिशय आनंद होत आहे. नीरज पांडेंसोबत काम करणे हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो व डॉक्युमेंटरीला वेगळा आकार देणा-या गोष्टी त्यांच्याकडून नेहमीच मिळतात. ही डॉक्युमेंटरी दर्शकांना नक्कीच बुद्धांच्या काळात घेऊन जाईल आणि त्यांचे जीवन व शिकवण ज्या काळात होती, त्या ऐतिहासिक काळाचे दर्शन घडवेल. आपल्या अध्यात्मिक वारशाला आकार देण्यामध्ये ज्या खोलवरच्या कहाण्यांनी योगदान दिले आहे, त्यांच्यासोबतही दर्शकांना जोडले जाण्याचे उद्दिष्ट ह्यात साध्य होईल.”

- Advertisement -

शोजचे निर्माता नीरज पांडे ह्यांची निर्मिती असलेल्या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये गौतम बुद्धांच्या शेवटच्या दिवसांभोवती असलेल्या रहस्यांना व आधुनिक काळात बौद्ध धर्मामध्ये केंद्रस्थानी असलेल्या असलेल्या अवशेषांच्या रहस्याला उलगडले जाईल. त्यामध्ये ह्या अवशेषांच्या मागे असलेले त्यांचे मूळ, सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामागे असलेल्या अध्यात्मिक कहाण्या ह्यांचा शोध घेतला जाईल आणि जगभरात त्यांचा झालेला प्रसार व बौद्ध धर्माला जगातील चौथा सर्वांत मोठा संप्रदाय बनवण्यामध्ये त्यांची भुमिका ह्याचाही शोध घेतला जाईल. अवशेषांविषयी अधिक खोलवर जाऊन त्यांचे वर्गीकरण शोधणा-या ह्या डॉक्युमेंटरीमध्ये बौद्ध धर्मातील त्यांच्या भुमिकेला व्यापक प्रकारे लक्षात घेण्यासाठी ऐतिहासिक व पौराणिक दृष्टीकोनांना एकत्रि प्रकारे बघितले जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -