घरमहाराष्ट्रAction against Suraj Chavan-Rajan Salvi : सुषमा अंधारे संतापल्या; भाजपावर केला प्रश्नांचा...

Action against Suraj Chavan-Rajan Salvi : सुषमा अंधारे संतापल्या; भाजपावर केला प्रश्नांचा भडीमार

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे, तर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला असून एसीबीकडून या प्रकरणाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईनंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी भाजपावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. (Action against Suraj Chavan Rajan Salvi Sushma Andahar got angry BJP was bombarded with questions)

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

- Advertisement -

सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडल्यानंतर आता भाजपाला भीती वाटू लागली आहे. आमदार अपात्रता प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आली असून राजन साळवींच्या घरावर धाड टाकण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. खरंच खिचडी घोटाळा झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुंबईचे पालिकेचे आयुक्त चहल अजूनही तिथेच आहेत. त्यांना विचारा, टेंडर ज्यांना दिले ते अमेय घोले आता भाजपासोबत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही? प्रवीण परदेशी कुठे आहेत? ते कुणाचे निकटवर्तीय आहेत? फडणवीस यांचे तर नाहीत ना? असे सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

अजित पवार पंतप्रधानावर अब्रू नुकसानीचा दावा करणार का? 

सुषमा अंधारे गौप्यस्फोट करताना म्हणाल्या की, राजन साळवी यांना भाजपाकडून ऑफर होती. मात्र ते निष्ठावंत राहिले. याआधीही त्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या, मात्र काही सापडले नाही. आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या भष्ट्राचाराविरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपासोबत गेले. त्यापूर्वी पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता अजित पवार भाजपासोबत आहेत, त्यामुळे पंतप्रधान माफी मागणार का? किंवा अजित पवार पंतप्रधानावर अब्रू नुकसानीचा दावा करणार का? असे सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

हेही वाचा – Mano Jarange Patil : राज्यातील 54 लाख कुणबींना मिळणार प्रमाणपत्र; अंमलबजावणी कधी होणार?

सुरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर कारवाई

मुंबई महानगरपालिकेच्या 6.37 कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती तसेच युवा सेनेचे कार्यवाहक सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी सायंकाळी उशिरा अटक केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे देखील (EOW) याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याशिवाय आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला असून एसीबीकडून याच प्रकरणाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी साळवी यांच्यावर रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -