घरताज्या घडामोडीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात चर्चा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात चर्चा

Subscribe

जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिल गेट्स यांच्याकडे सूचना मागितल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि बिल अँण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली. कोरोना साथीचा जगावर झालेला परिणाम यावर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. वैज्ञानिक नाविन्य आणि संशोधन आणि विकास या चर्चेत सहभागी होते. गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्यविषयक कामांची केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर अनेक भागातील कामांबद्दल मोदींनी प्रशंसा केली. जगाच्या हितासाठी भारताच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल या संदर्भात त्यांनी बिल गेट्स यांच्याकडे सूचना मागितल्या आहेत.

मोदींनी सरकारच्या कामांविषयी दिली माहिती

पंतप्रधानांनी सरकारच्या कामांचा उल्लेख केला. या साथीच्या काळात भारतातील आरोग्य सेवा कशा मजबूत केल्या जात आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देखील वापरली जात आहेत. स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे. या सर्व गोष्टींमुळे भारताला कोरोना साथी विरोधात लढा देण्यास बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी गेट्स यांना सांगितलं की भारतातील लोकांनी सामाजिक अंतर राखण्याचं पालन केलं आहे. यासह, मास्क घालण्यापासून ते लॉकडाऊनचे नियम पाळण्यापर्यंत नागरिकांनी सहकार्य केलं आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात थोडसं यश मिळालं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्थलांतरीत मजुरांसाठी १२०० गाड्या तयार, राज्य सरकारांच्या परवानगीच्या प्रतिक्षेत


कोरोनाशी युध्दात भारताची भूमिका महत्त्वाची – बिल गेट्स

बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चर्चा केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की या साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी जागतिक भागीदारी आवश्यक आहे. सामाजिक आणि आर्थिक प्रभाव कमी करण्यात आणि सर्वांसाठी लस, चाचणी आणि उपचार उपलब्ध करण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -