घरताज्या घडामोडीDomestic Air Travel: प्रवासी भाडेवाढ नाही केल्यास उड्डाण करणं कठीण, ज्योतिरादित्य सिंधियांचे...

Domestic Air Travel: प्रवासी भाडेवाढ नाही केल्यास उड्डाण करणं कठीण, ज्योतिरादित्य सिंधियांचे वक्तव्य

Subscribe

जर देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिट दरात वाढ केली नाही तर विमान उड्डाण करणे कठीण होईल असे वक्तव्य केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केलं आहे. कारण इंधनाच्या दरात मागील ८ महिन्यांमध्ये २२ डॉलर प्रति बॅरलवरुन ८५ डॉलर प्रति बॅरल एवढी वाढ झाली आहे. देशातील विमान कंपनीच्या खर्चाच्या आकडेवारीमध्ये एकूण ४० टक्के इंधनाचा सहभाग आहे. विमान प्रवासाच्या दरात वाढ केल्यास देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.

देशातंर्गत विमान प्रवासाच्या भाड्यात यापुर्वी १२ ऑगस्टमध्ये वाढ करण्यात आली होती. उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवासाच्या दरात खालच्या आणि उच्च पातळीतील दरांमध्ये वाढ केली होती. उड्डाण मंत्रालयाकडून खालच्या म्हणजे ४० मिनिटपर्यंत वेळ लागणाऱ्या विमान प्रवासाच्या दरात २,६०० वरुन ११.५३ टक्के वाढ करुन २,९०० केले होते. तसेच वरच्या पातळीतील विमान प्रवासाच्या दरात १२.८२ टक्के वाढ करत ८,८०० रुपये केले होते.

- Advertisement -

विमान कंपनीच्या खर्चामध्ये मागील ८ महिन्यांमध्ये ४ पटीने वाढ झाली आहे. तर इंधनाचे दर २२ डॉलर प्रति बॅरलवरुन थेट ८४ डॉलर प्रति बॅरल झाले असल्याची माहिती सिंधिया यांनी दिली. तसेच यावर केंद्राकडून ११ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाते तर राज्य सरकारकडून १ टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारला जातो. त्यामुळे भाडेवाढ केली नाही तर एखादी कंपनी कशी सुरु राहील असा प्रश्न केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे.

उड्डाण मंत्रालयाद्वारे भाडेवाढ करण्याचे कारण असे आहे की, कच्चा मालाची किंमत ४०० टक्क्यांनी वाढ केल्यास कंपन्यांनाही दिलासा देण्यात यावा. मंत्रालयाद्वारे सर्व राज्य सरकारांना आपल्या राज्यातील व्हॅट कमी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. यासाठी मागील ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये आतापर्यंत २५ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे समजवण्याचा प्रयत्न करत आहे की, व्हॅटमध्ये वाढ करुन राज्यांच्या विकास कसा रखडत आहे. असे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान मंत्री सिंधिया पुढे म्हणाले की, मागील ४० दिवसांत जम्मू आणि काश्मीर, अंदमान निकोबार बेट, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा या राज्यांनी विमान खर्चात व्हॅट (एटीएफ) २५ ते २८ टक्क्यांवरुन थेट १ आणि २ टक्क्यांवर आणला आहे.


हेही वाचा : बलात्कारातील दोषीला ३० दिवसांत जन्मठेपेची शिक्षा, तीन मुलांचा बाप आहे आरोपी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -