घरटेक-वेकफ्री WIFI वापरताय? सावधान! खाजगी डेटावर हॅकर्सचा डल्ला, संशोधन अहवाल

फ्री WIFI वापरताय? सावधान! खाजगी डेटावर हॅकर्सचा डल्ला, संशोधन अहवाल

Subscribe

हल्ली इंटरनेटशिवाय आपलं पान हलत नाही. इंटरनेट नसेल तर अनेकांना जणून काही हरवल्यासारखं वाटते. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्य़ेक जण इंटरनेटचा वापर सर्रास करताना दिसतात. यात ग्राहकांची फास्ट इंटरनेट स्पीडची डिमांड पाहता अनेक कंपन्यांकडून मोठ-मोठे प्लान्स दिले जातायत. तर अनेक ठिकाणी वायफायच्या माध्य़मातून थेट इंटरनेटचा वापर होतोय. यात तर फ्री वायफाय मिळत असेल तर अनेक जण त्यावर तुटून पडतात. आपला मोबाईल किंवा लॅपटॉप फ्री वायफायला जोडण्याचा प्रयत्न करता. मात्र बऱ्याचदा मोबाईल किंवा इतर वस्तूंवर फ्री वायफाय सुविधेचा फायदा घेताना आपण एक बाब विसरतो की, त्याचा अॅक्सेस दुसरा कुणीही घेऊ शकतो. यांच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कदायक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

काही देशांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भारतात जवळपास ५० टक्के युजर्स फ्री-वायफायचा वापर करताना दिसतात. यामाध्यमातून आपली अत्यंत खासगी आणि संवेदनशील माहिती इंटरनेटवर टाकतात. उदा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, जी पे. मात्र असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. कारण तुमची खासगी माहिती ही हॅकर्सच्या माध्यमातून चोरीला जातेय. यावर इंटल सिक्युरिटी इंडिया डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख वेंकट कृष्णापूर यांच्या मते, अनेकदा यूजर्स आपली खाजगी महिती असुरक्षित वाय-फायच्या माध्यमातून शेअर किंवा अपलोड करत असतात. यामुळे सायबर क्राईम वाढण्यास चालना मिळतेय. कारण यातून क्रेडिट कार्ड किंवा वर्क मेलमधील माहिती चोरी होऊ शकते.

- Advertisement -

भारतापाठोपाठ मेक्सिकोमध्ये ३७ टक्के आणि ब्राझीलमध्ये २८ टक्के युजर्सचा फ्री वायफाय वापरण्याकडे कल आहे. यात १२ ते ५४ वयोगटातील १४२३ जणांवर हा सर्व्हे करण्यात आला, तर जागतिक पातळीवर १४०००० युजर्सवर हा सर्व्हे करण्यात आला.

आजकाल अनेक ठिकाणी सोईसाठी फ्री वायफाय दिले जाते, मात्र फ्री वायफाय सुविधेचा लाभ घेताना इंटरनेट किंवा हॉटस्पॉट किती सुरक्षित आहे हे देखील आपण तपासत नाहीत. कारण पब्लिक वायफाय नेटवर्कमध्ये हॅकर्स नेहमी अॅक्टिव्ह असतात. याच माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या यूजर्सची माहिती मिळते. काही हॅकर्स तर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी फ्री हॉटस्पॉटही देतात. जे लोक या हॉटस्पॉटला लॉगिन करतात त्यांच्या मोबाईलमधील सर्व महत्त्वाची माहिती हॅकर्सकडे जाते. यामध्ये बँकेच्या पासवर्डपासून ते अनेक महत्त्वाचे संवेदनशील गोष्टींचाही समावेश आहे. या माहितीच्या आधारावर हॅकर्स युजरला नंतर ब्लॅकमेल करतात किंवा लुबाडतात. त्यामुळे वायफायच्या माध्यमातून खासगी माहिती पाठवणे टाळा.

- Advertisement -

फ्री वाय-फाय वापरताना घ्या या गोष्टींची काळजी

१) पासवर्ड नसणाऱ्या वाय-फायचा वापर शक्यतो टाळा.

२) फ्री वाय-फाय वापरत असताना कोणतेही ऑनलाइन पेमेंट करुन नका, कारण ऑनलाइन पेमेंट करताना तुम्ही जे पासवर्ड आणि बँक डिटेल्स फोनमध्ये टाकाल ते हॅकर्स हॅक करू शकतात.

४)कोणतेही पासवर्ड वाय-फाय सुरू असताना सेव्ह करू नका.

५) तसेच वायफायवर इतर शेअरींग अॅप्सचा वापर करू नका.


बलात्कारातील दोषीला ३० दिवसांत जन्मठेपेची शिक्षा, तीन मुलांचा बाप आहे आरोपी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -