घरताज्या घडामोडीचीनच्या ताब्यातल्या भूभागाचं सत्य पंतप्रधानांनी सांगावं - राहुल गांधी

चीनच्या ताब्यातल्या भूभागाचं सत्य पंतप्रधानांनी सांगावं – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीन वादावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक हल्लात भारताने २० जवान शहीद झाले. तेव्हापासून परिस्थिती तणावपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी न घाबरता सत्य सांगावं की चीनने जमीन घेतली आहे आणि आपण कारवाई करण्यासाठी जात आहोत. अशा परिस्थितीत संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे.’

राहुल गांधी व्हिडिओत नक्की काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले की, ‘संपूर्ण देश हा सैन्य आणि सरकारसोबत पाठिशी आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारताची एक इंच जमीन कोणीही घेतली नाही, कोणीही भारतातच्या हद्दीत आलं नाही. परंतु लोक बोलतायत, सॅटेलाईटसच्या फोटोमध्ये दिसतय, लडाखचे नागरिक सांगतायत एवढेच नव्हे तर सैन्यातील निवृत्त अधिकारी म्हणतं आहेत की, चीनने आपली जमीन ताब्यात घेतली आहे. एक जागी नाही तर तीन जागी चीनने जमीन ताब्यात घेतली आहेत. पंतप्रधानजी तुम्हाला खरं बोलावं लागले. देशाला सांगावं लागले, घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुम्ही सांगत असला की जमीन गेली नाही आहे. पण खरंच चीनने जमीन ताब्यात घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला एकजूट होवून लढायचे लागेल आणि त्यांना बाहेर फेकून द्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला खरं बोलावं लागेल. न भीता, न घाबरता तुम्हाला बोला. चीनने आपली जमीन ताब्यात घेतली आहे आणि आपण कारवाई करण्यासाठी जात आहोत. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटचा प्रश्न, आपल्या शहीद सैनिकांना शस्त्राशिवाय सीमेवर कोणी पाठविलं आणि का?, असा सवाल राहुल गांधींनी मोदींना केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF जवान शहीद, चिमुकल्याचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -