घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF जवान शहीद, चिमुकल्याचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF जवान शहीद, चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहारातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सीआरपीएफने दिली आहे.

- Advertisement -

एएनआयने दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ९० बटालियनवर १२ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुचाकीवरून दहशतवादी आले आणि त्यांनी सीआरपीएफच्या तैनात असलेल्या पथकावर गोळीबार केला. सीआरपीफने राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी या जवानांना तैनात केलं होतं. मात्र यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्लात सीआरपीएफचा एक जवान आणि १२ वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. त्यानंतर या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झाला होता.


हेही वाचा – जम्मू काश्मीर: त्रालमध्ये पुन्हा चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -