घरदेश-विदेशCovid Vaccine: आता देशाच्या दुर्गम भागात होणार ड्रोनद्वारे कोविड -१९ लसीचा पुरवठा!

Covid Vaccine: आता देशाच्या दुर्गम भागात होणार ड्रोनद्वारे कोविड -१९ लसीचा पुरवठा!

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून शहरी भागात कहर करणारा हा कोरोनाचा संसर्ग आता देशातील दुर्गम भागात देखील पोहोचला आहे. मात्र आता दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना लवकरच कोविड -१९ ही लस ड्रोनद्वारे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वतीने एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेडने भारतातील निवडक ठिकाणी यूएव्हीद्वारे वैद्यकीय पुरवठा पोचविण्यासाठी एक्सप्रेसशन ऑफ इंटरेस्टला आमंत्रित केले आहे.

आयसीएमआर यूएव्ही ऑपरेटरद्वारे पूर्व-निर्धारित किंवा पूर्व-मंजूर उड्डाण मार्गांवर ऑपरेट करण्यासाठी आणि कोविड -१९ लस देणार आहे. इच्छुकांनाही त्यासाठी अर्ज करण्यासाठी प्रोफार्मा देण्यात आला आहे. एचएलएलने आवश्यक यूएव्हीसाठी काही खास वैशिष्ट्ये दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार असे सांगण्यात येत आहे की, कंपनीच्या माहितीनुसार, ड्रोन कमीतकमी हवाई अंतर किमान १०० मीटर उंचीवर ३५ किमीपर्यंत व्यापू शकणार आहे. हे व्हर्टिकली उडण्यास कमीतकमी ४ किलो पेलोड घेऊन जाण्यास आणि होम बेसवर परत पाठवण्यास सक्षम असायला हवा. तसेच, एचएलएलने स्पष्ट केले आहे की, पॅराशूटच्या माध्यमातून डिलिव्हरी करण्यास पूर्णतः विरोध दर्शवण्यास येणार आहे. यासह एचएलएल पुढे असेही म्हटले की, प्रस्तावित करार ९० दिवसांसाठी वैध असणार असून यूएव्ही ऑपरेटरच्या कामगिरी आणि प्रोग्रामच्या गरजेनुसार वाढविला जाऊ शकतो.

- Advertisement -

नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन संचालनालयाने (DGCA) आयसीएमआरला ड्रोनचा वापर करून कोरोना लस वितरणाचा अभ्यास करण्यास सशर्त सूट दिल्यानंतर साधारण दोन महिन्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आयसीएमआरने आयआयटी कानपूरशी भागीदारी केली आहे. केंद्राने म्हटले की, ही सूट एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत लागू असणार आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -