घरमहाराष्ट्रसत्ता असेल किंवा नसेल शिवसेना गुलामगिरीत जगत नाही - संजय राऊत

सत्ता असेल किंवा नसेल शिवसेना गुलामगिरीत जगत नाही – संजय राऊत

Subscribe

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना खिशात राजीनामे ठेवणाऱ्यांनी दिले का नाही, अशी बोचरी टीका केली होती. यावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, असं रोखठोक उत्तर संजय राऊत यांनी दिलं. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी उत्तर देताना, “सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात मला माहित नाही. तुम्ही माझ्या भाषणाचा अर्थ समजून घ्या. माझं भाषण हे पक्ष कार्यकर्त्यांना होतं. कोणी बाहेर काढलं माहीत नाही. मी असं म्हणालो की शिवसेना ही स्वाभिमानाची भुकेलेली आहे. सत्ता असेल किंवा नसेल पण आम्ही राजकारणात कधी गुलामगिरीचं जीवन जगलो नाही. सत्तेमध्ये असून आम्हाला दुय्यम वागणूक त्यावेळी मिळत होती. हे काय मी आता बोलत नाही आहे. त्यावेळी पण आमची लोकं बोलत होती. आमच्या मंत्र्यांना मान मिळत नाही, शिवसैनिकांची कामं होत नाहीत. आताच्या सत्तेत आम्हाला स्वाभिमान आहे,” असं म्हणाले.

- Advertisement -

आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात, मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं, आमचे सर्व लोक चांगलं काम करतात. आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होत आहे. पक्षात कायम बदल होतात मात्र घडी बसवली आहे, बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं. आमचे सर्व लोक चांगलं काम करतात. आता हळूहळू संघटनेचं काम चांगलं होत आहे. अनुभवी लोकांची समिती स्थापन करु असं संजय राऊत म्हणाले.

वाघाच्या मिशीला हात लावण्याची हिम्मत नाही

महाराष्ट्रातील राजकारणी आपण आहोत संस्कार आहेत, शत्रुत्व टोकाचं नसत, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. वाघाच्या मिशीला हात लावण्याची हिम्मत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -