घरदेश-विदेशगुटख्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर पाणी साचले

गुटख्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर पाणी साचले

Subscribe

दिल्लीमध्ये पाणी तुंंबण्याच्या समस्येमागे आयआयटी खडगपूरने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये दिल्लीमध्ये पाणी तुंबण्याचे कारण गुटखा आणि पान मसाला असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दिल्लीच्या गल्लोगल्लींमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. थोडाफार जरी पाऊस पडला तरी दिल्लीच्या रस्त्यांवर पाणी साचते. यामागे दिल्लीची नागरी प्रशासन व्यवस्था पावसाअगोदर नाले साफ करत नसल्याचे तेथील रहिवासी सांगतात. मात्र, पाणी साचण्यामागे गुटखा आणि पान असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. आयआयटी खडगपूरने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार दिल्लीमध्ये पाणी साचण्यामागे दिल्लीच्या लोकांची गुटखा आणि पान खाण्याची सवय कारणीभूत आहे. या अहवालानुसार दिल्लीत २२% पेक्षा जास्त लोक पान आणि गुटख्याचे सेवन करतात. गुटखा आणि पान खाल्ल्यानंतर त्याच्या प्लॅस्टिकच्या पुड्या गटारीत टाकतात. त्यामुळे गटारीचे पाणी तुंबते.

काय आहे अहवाल?

आयआयटी खडगपूरच्या अर्बन प्लानर अॅंड रिसर्च डिपार्टमेंटने दिल्लीमध्ये पाणी तुंबण्याच्या समस्येमागील कारण शोधण्यासाठी एक सर्वेक्षण केले ज्या सर्वेक्षणामध्ये पाणी तुंबण्यामागे पान मसाला आणि गुटख्याचे पाऊच असल्याचे समोर आले. या सर्वेच्या अहवालानुसार दिल्लीच्या नाल्यांमध्ये ३९% कचरा घरातून निघतो, २७% कचरा प्लॅस्टिकचा, १२% चिखल आणि २२% कचरा पान मसालाचे पाउच आहेत. या अहवालात ही समस्या सुटण्यासाठी सल्ला देखील दिला गेला आहे. पॅकिंगच्या कचऱ्याची जर विल्हेवाट लावली तर समस्या सुटू शकते, असे अहवालात सांगण्यात आले आहे. हे सर्वेक्षण २ जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान करण्यात आले आहे.

- Advertisement -

आयआयटी खडगपूरचे अर्बन डिझाईन अॅंड रोड मॅनेजमेंटचे प्रोफेसर टी.एस. रामचंद्रन यांनी सांगितले की, ‘दिल्लीचे नाले गुटखा फॅक्टरी सारखे दिसत आहे. गुटख्याच्या पुड्यांचा जो कचरा आहे तो सामान्य प्लॅस्टिकच्या कचऱ्यापेक्षाही हानिकारक आहे’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -