घरक्राइमDVAC Vs ED : 20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, उपक्षेत्रीय...

DVAC Vs ED : 20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, उपक्षेत्रीय कार्यालयात शोधमोहीम

Subscribe

चेन्नई : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी अंकित तिवारी लाचप्रकरणी तामिळनाडू दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाच्या (DVAC) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रभर मदुराई येथील सक्तवसुली संचालनालयाच्या उपक्षेत्रीय कार्यालयात शोधमोहीम राबवली होती.

हेही वाचा – Amol Kolhe : …अशा सूचना कोणाकडून दिल्या जातात? ‘तो’ धक्कादायक अनुभव कथन करताना अमोल कोल्हेंचा सवाल

- Advertisement -

डिंडीगुल जिल्ह्यातील एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना ईडीचा अधिकारी अंकित तिवारी याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले होते. ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसह अँकित तिवारी हा अनेक लोकांना धमकावत होते आणि ईडीच्या केस बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होते, अशी माहिती डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी तिवारी याला डिंडीगुलमध्ये 20 लाखांच्या रोकडसह पकडले. डीव्हीएसीने मदुराई येथील ईडी कार्यालयाचीही झडतीही घेतली.

- Advertisement -

या पद्धतीचा अवलंब करून अंकित तिवारीने इतर कोणत्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केले किंवा धमकावले आणि ईडीच्या नावाने पैसे गोळा केले, याची चौकशी सुरू असल्याचे DAVC अधिकाऱ्यांनी सांगितले. DVACने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अंकित तिवारी याला डीएव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. यानंतर त्याला सकाळी 10.30 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली. या कारवाईत अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबतची कागपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अंकित तिवारी याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता अंकित तिवारीची रवानगी 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या नावाचा वापर

आरोपी अधिकारी अंकित तिवारीने ऑक्टोबरमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एका खटल्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे, हे प्रकरण आधीच निकाली काढण्यात आले आहे. पण पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना मिळाल्या असल्याचे सांगत, अंकित तिवारीने या कर्मचाऱ्याला 30 ऑक्टोबर रोजी मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले, असे डीव्हीएसीने म्हटले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar Vs Awhad : …आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना आव्हान

सरकारी कर्मचारी मदुराईला गेला असता, या प्रकरणातील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अंकितने या कर्मचाऱ्याकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली. नंतर आपल्या वरिष्ठांशी यासंदर्भात बोललो असून त्यांच्या सूचनेनुसार 51 लाख रुपये देण्यास सांगितले. 1 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्याने त्याला लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये दिले. त्यानंतर तिवारीने कर्मचार्‍याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून संपूर्ण 51 लाख रुपये दे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. याच संशय आल्याने सरकारी कर्मचाऱ्याने गुरुवारी डिंडीगुल जिल्हा दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक युनिटकडे ईडी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे शुक्रवारी डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी अंकित तिवारी याला तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -