घरमहाराष्ट्रSujay Vikhe: रात्री कोण कोणाच्या घरी जातं? निवडणुका लागू द्या, यांच्या लफड्यांचे...

Sujay Vikhe: रात्री कोण कोणाच्या घरी जातं? निवडणुका लागू द्या, यांच्या लफड्यांचे व्हिडीओ दाखवतो; सुजय विखेंच्या वक्तव्यानं खळबळ

Subscribe

अहमदनगर: निवडणूक लागू द्या, माझ्यावर आरोप-टीका करणाऱ्यांच्या अंगावर मी कपडेसुद्धा ठेवणार नाही. साडेचार वर्ष माझ्या विरोधकांनी काय काय लफडे केले याचे व्हिडिओ शूटिंगदेखील माझ्याकडे आहे, असं म्हणत भाजप खासदार विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अमहमदनगर तालुक्यातील पोखर्डी येथे खासदार निधीतून होत असलेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. (Sujay Vikhe Patil Who goes to whose house at night Shows videos of the slogans of Let the elections be implemented Excitement by Sujay Vikhe Patil statement)

विखे पाटील म्हणाले की, रात्री कोण कोणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत, असं जाहीर वक्तव्य सुजय विखेंनी एका सभेत केलं. तसंच वेळ आल्यावर हे काय करतात हे सगळ्यांना पुराव्यांसह दाखवेन, असा इशाराही दिला. यानंतर विखेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

सुजय विखे म्हणाले, कुणाचं खातं कोणत्या बँकेत आहे, कोण कुठं जातं, कोण रात्री बाहेर पडतं, कोणाच्या घरी जातं हे मला पूर्णपणे माहिती आहे. माझ्याकडे याचं व्हिडीओ शुटिंगही आहे.

विखे म्हणाले की, मी 6 महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं ठेवली आहेत. हे काय करतात, काय नाही हे सगळ्या पुराव्यांसह दाखवेन. फक्त त्यांना एकदा उभं राहू द्या, असा इशारा सुजय विखेंनी दिला. तसंच माझा फार छोटा प्रश्न आहे. हे साडेचार वर्षे कुठं होते, असा प्रश्नही विचारला.

- Advertisement -

सुजय विखे म्हणाले, माझ्याकडे सगळ्यांची उत्तरं आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मी कशी भाषणं करतो. त्यामुळे मला ते सांगायची गरज नाही, वेळ आल्यावर सर्व व्हिडीओ दाखवणार आहे. आरोप करणाऱ्यांचे कपडेही ठेवणार नाही, असा इशाराही सुजय विखेंनी दिला.

(हेही वाचा: Amol Kolhe : …अशा सूचना कोणाकडून दिल्या जातात? ‘तो’ धक्कादायक अनुभव कथन करताना अमोल कोल्हेंचा सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -