घरदेश-विदेशमोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली - चिदंबरम

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली – चिदंबरम

Subscribe

चिदंबरम यांनी त्यांच्या ‘अनडॉन्टेड: सेविंग द आइडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकाद्वारे मोदी सरकारवर ही टीका केली आहे.

मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेची वाट लावल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. ‘२००८ सालच्या आर्थिक मंदीमधून सावरलेली भारताची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे कोलमडली आहे’, असा थेट आरोप चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम म्हणतात की ‘२००८ मध्ये वृद्धी दर हा ७.५ टक्के होता. समाजाला झालेले नुकसान  जेवढे चिंताजनक आहे तेवढेच अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसानही चिंताजनक आहे. मात्र, मोदींना ते चिंताजनक वाटत नाही. अर्थव्यवस्था वर येईल असे विचार ज्या ज्या लोकांनी मांडले होते, तेच लोक आता निराश झाले असल्यामुळे  सरकाराल सोडून जात आहेत.’ चिदंबरम यांनी त्यांच्या ‘अनडॉन्टेड: सेविंग द आइडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकाद्वारे मोदी सरकारवर ही टीका केली आहे. ८ फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.

पुस्तकाविषयी चिदंबरम सांगतात…

आपल्या पुस्तकाबाबत माहिती देताना चिंदबरम सांगतात की, ‘अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवणारी अशी एक जुनी सभ्यता आहे. देशाने गेल्या ७१ वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, लोकांना त्यापासून वाचवणं हे चिंतेचं कारण बनलं आहे.’ सदर पुस्तकातून या सगळ्या मुद्द्यांवप प्रकाशझोत टाकण्यात आला असून, त्याचं सखोल विश्लेषण करण्यात आलं आहे. चिंदबरम म्हणतात की, ‘माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकशाहीचे मौलिक नियम ठाऊक होते. त्यांनी शिष्टाचारपूर्वक १३ दिवसांनंतर, १३ महिन्यानंतर पुन्हा एकदा पाच वर्षांची सत्ता सोडली होती. आजच्या घडीला देशात संविधानाच्या मुल्ल्यांवर हल्ले होत आहेत. भारताच्या संविधानाचा दस्ताऐवज हिंदुत्व नावाच्या एका विचारधारेने प्रेरित होऊन बदलला जाईल, अशी भीती वाटते. यामुळे भारताचा विचार संपुष्टात होईल.’ दरम्यान, ‘अशी परिस्थिती ओढावल्यास त्यातून मुक्ती मिळण्यासाठी आणखी एका स्वातंत्र्य संग्रामाची आणि महात्मा गांधींची गरज भासेल’, असंही चिंदबरम यांनी म्हटलं आहे.


वाचा: काँग्रेसचा नवा उपक्रम – ‘अपनी बात राहुल के साथ’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -