घरदेश-विदेशECI : निवडणूक आयोग केंद्र सरकारवर बरसले; विकसित भारत संपर्क तत्काळ बंद...

ECI : निवडणूक आयोग केंद्र सरकारवर बरसले; विकसित भारत संपर्क तत्काळ बंद करा

Subscribe

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. ‘विकसीत भारत संपर्क’ अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेले Whats App संदेश तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विकसित भारत संपर्क अंतर्गत नागरिकांना संदेश पाठवले जात आहे. या संदेशाद्वारे सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवली जात आहे. हे आचार संहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला या संबंधीचे आदेश दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. भारत सरकारच्या विकसित भारत संपर्क केंद्राने हे पत्र देशभरातील लोकांना पाठवले आहे. पत्रात पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला ‘परिवारजन’ म्हणजे ‘कुटुंबातील व्यक्ती’ असे संबोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे लिहिले की, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल ही आमच्या सरकारची गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठी उपलब्धी आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर आहेत.
असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत संपर्क या whatsapp ग्रुपद्वारे देशभरातील नागरिकांना पाठवले आहे.

- Advertisement -

यापुढे असे पत्र पाठवले जाऊ नये असे आदेश निवडणूक आयोगाने मंत्रालयाला दिले आहे. त्यासोबतच आयोगाने मंत्रालयाला याप्रकरणी खुलासा मागितला. त्यावर मंत्रालयाने आयोगाला सूचित केले की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र हे आचारसंहिता लागू होण्यापुर्वीचे म्हणजे 16 मार्चपूर्वीचे आहे. कारण काही संदेश हे नेटवर्क कारणामुळे उशिरा पोहचले.

हेही वाचा : LokSabha Election : नागपूर, चंद्रपूरसह पाच जागांसाठी अधिसूचना; महायुती, मविआचे उमेदवार कधी ठरणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -