घरदेश-विदेशFB च्या झुकरबर्गला मागे टाकत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क तिसऱ्या स्थानी

FB च्या झुकरबर्गला मागे टाकत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क तिसऱ्या स्थानी

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या क्रमांकावर

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ एलन मस्क हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यावेळी फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्गला मागे टाकत एलन हे तिसऱ्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सने ही यादी आणि आकडेवारी जारी केली असून मस्क यांची संपत्ती वाढून १११५.४ अब्ज डॉलर झाली आहे, तर मार्क झुकरबर्गची संपत्ती ११०.८ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. तर शेअर्सच्या फॉरवर्ड स्टॉक स्पिल्टनंतर टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे, परिणामी एलन मस्क यांची संपत्ती वाढली आहे. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून एलन मस्क अजून फारच दूर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांची संपत्ती एलन मस्कपेक्षा २०० अब्ज डॉलरने जास्त आहे.

आठव्या स्थानावर मुकेश अंबानी

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती ७९.८ बिलियन डॉलर आहे. यापुर्वी मुकेश अंबानी श्रीमंताच्या यादीत चौथ्या क्रमांवर पोहोचले होते. २८ जुलै रोजी मुकेश अंबानी यांची संपत्ती ८१.९ बिलियन डॉलर झाली होती. ही आतापर्यंतची त्यांची सर्वाधिक संपत्ती होती.

- Advertisement -

तर ही ठरली जगातील सर्वात श्रीमंत महिला

मस्क यांच्याशिवाय जेफ बेजोस यांची घटस्फोटित पत्नी मॅकेन्जी स्कॉट ही जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. तिने लॉरिअलची वारसदार फ्रँकोई बेटनकोर्ट मेअर्सला मागे टाकलं आहे. स्कॉटला जेफ बेजोसच्या अॅमेझॉन डॉट कॉम मधील ४ टक्के वाटा मिळाला आहे. बेजोससोबत घटस्फोटाच्या वेळी तिला ही संपत्ती मिळाली. स्कॉटची ४ टक्के भागीदारी ही ६६.४ अब्ज डॉलर एवढी आहे.


चीनची मुजोरी; म्हणे ‘यापूर्वी झाली नसेल इतकी मोठी लष्करी हानी करू’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -