घरदेश-विदेशचीनची मुजोरी; म्हणे 'यापूर्वी झाली नसेल इतकी मोठी लष्करी हानी करू'

चीनची मुजोरी; म्हणे ‘यापूर्वी झाली नसेल इतकी मोठी लष्करी हानी करू’

Subscribe

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चीनने पँगॉग येथील परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय लष्करांनी सडेतोड उत्तर देत हुसकावून लावले. मात्र चीनने भारताला डिवचले असून स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर भूतकाळात झाले नाही इतकी मोठी लष्करी हानी करु, अशी धमकी दिली आहे. सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने भारताला धमकावले आहे.

- Advertisement -

चीनने ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारताकडूनच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केली असा दावा केला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका, असेही चीनने म्हटले आहे. पण जर भारताला संघर्ष करण्याची इच्छा असेल तर चीनकडे अधिक साधने आणि क्षमता आहे. जर भारताला लष्करी सामर्थ्य दाखवायचे असेल तर पिपल्स लिबरेशन आर्मी भारतीय लष्कराला १९६२ मध्ये झाले त्यापेक्षाही जास्त नुकसान सहन करण्यास भाग पाडेल, अशी धमकी चीनने दिली आहे.

दरम्यान, जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यावेळी भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचेही मोठे नुकसान झाले होते. यानंतर चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी सैन्य माघार घेण्यास सहमती दर्शवली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

न ढोलताशे, न मिरवणूक… साधेपणाने होणार ‘बाप्पा’चे विसर्जन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -