घरताज्या घडामोडीमंदिरे उघडण्यासाठी MIM आक्रमक; औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन

मंदिरे उघडण्यासाठी MIM आक्रमक; औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन

Subscribe

धार्मिक स्थळांना अद्याप परवानगी देण्यात आली नसल्यामुळे आता एमआयएम आक्रमक झाल्याचे दिसून येत असून त्यांनी आता मंदिरे-मशिदी उघडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

राज्य सरकारने अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील करण्यात आली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, धार्मिक स्थळांना अद्याप परवानगी देण्यात आली नसल्यामुळे आता एमआयएम आक्रमक झाल्याचे दिसून येत असून त्यांनी आता मंदिरे-मशिदी उघडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

एमआयएमने दिले निवेदन

एमआयएमने मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन दिले आहे. तर औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम आता भेट देखील घेणार आहेत. त्याचप्रमाणे निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम उद्यापासून सुरु होणार आहे.

- Advertisement -

एमआयएमचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम

‘राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू’, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला दिले होते.

‘जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?’, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, ‘मशिदी उघडणार’, असे म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवाल नाशिकमधील साधू महंतांनी विचारला होता. एमआयएम आणि सरकारची मिलीभगत आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला होता.

- Advertisement -

तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मंगळवारी, पंढरपूर येथे आंदोलन केले होते. तसेच त्यांनी काल काही मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उपस्थित ‘वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत’, असे समजून दर्शन घेण्याचं आवाहन केले होते.


हेही वाचा – E-Pass पासून मुक्तता; Unlock 4 जनतेला दिलासा देणारी नियमावली जाहीर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -