घरताज्या घडामोडी'माझ्यावर टीका ठीक आहे पण...', पत्रकारांचे अकाऊंट बंद करण्यावर एलॉन मस्कचे स्पष्टीकरण

‘माझ्यावर टीका ठीक आहे पण…’, पत्रकारांचे अकाऊंट बंद करण्यावर एलॉन मस्कचे स्पष्टीकरण

Subscribe

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी (Twitter CEO Elon Musk) घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अशातच आता ट्विटरने काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केल्याची माहिती समोर येत आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी (Twitter CEO Elon Musk) घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अशातच आता ट्विटरने काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट्सच्या काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केले आहेत. त्यांच्या या निर्णयांनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. त्यावर एका युझरला एलॉन मस्क यांनी उत्तर दिले. ‘जे नियम इतरांनी आहेत, तेच नियम पत्रकारांना लागू होतात’, असे उत्तर एलॉन मस्क यांनी दिले. (elon musk on twitter bans journalists handles)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरचे अकाऊंट्स संस्पेंड केल्यानंतर एका युझरला उत्तर देताना एलॉन मस्क यांनी सांगितले की, “डॉक्सिंगचे नियम इतर सर्वांप्रमाणेच पत्रकारांना लागू होतात. ट्विटरच्या नियमांनुसार वैयक्तिक माहिती शेअर करणे याला डॉक्सिंग म्हणतात. दिवसभर माझ्यावर टीका करणे पूर्णपणे ठीक आहे, पण माझी वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे, तसंच माझ्या परिवाराला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचं आहे”

- Advertisement -

दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट्सच्या काही पत्रकारांचे अकाऊंट्स ट्विटरने सस्पेंड केले आहेत. मात्र, अद्याप त्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्यामागचे कारण समोर आलेले नाही. मात्र, या सगळ्या पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये एलॉन मस्क आणि त्याच्या येण्याने ट्विटरमध्ये झालेले बदल याविषयी लिहिले होते.

या पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, टाइम्स रिपोर्टर रायन मॅक (@rmac18), पोस्ट रिपोर्टर ड्र्यू हार्वेल (@drewharwell), CNN रिपोर्टर डॉनी ओ’सुलिव्हन (@donie), आणि Mashable रिपोर्टर मॅट बाइंडर (@MattBinder) यांचे ट्विटर अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आले आहेत. अमेरिकन धोरण आणि राजकारण कव्हर करणारे स्वतंत्र पत्रकार आरोन रुपार (@atrupar) यांचेही ट्विटर अकाऊंट्स सस्पेंड निलंबित करण्यात आले आहे.


हेही वाचा – …अन् वाहन पूजेसाठी ‘त्या’ व्यावसायिकाने आणले नवीन हेलिकॉप्टर; व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -