घरमहाराष्ट्रमविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा

मविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा

Subscribe

महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगार, महागाईसह अनेक प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष 17 डिसेंबरला मुंबई विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून बरे राजकारण रंगतेय. अशात सत्ताधारी भाजप शिंदे सरकारचे नेतेही मविआच्या मोर्चावर सडकून टीका करत आहेत. अशात मविआच्या मोर्चाला शह देण्यास आता भाजपने मविआ नेत्यांविरोधात उद्या माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून आणि सुषमा अंधारेंनी हिंदू देवीदेवतांविषयी केलेल्या विधानांच्या निषेधार्थ भाजप उद्या मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार, सुषमा अंधारे, नाना पटोले यांच्याकडून माफीची मागणी केली जाणार आहे. पूर्ण मुंबईभर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत दिली आहे. यावेळी त्यांनी मविआ नेत्यावर सडकून टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान खासदार संजय राऊत यांना भाजपच्या विधीमंडळाचे उपनेते आमदार भाई गिरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तकं भेट दिली आहे, यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संपूर्ण अभ्यास करावा, दिलेली पुस्तक राऊत वाचतील अशी अपेक्षा आहे, असही शेलार म्हणाले.

- Advertisement -

मविआचा ज्याबाबत मोर्चा आहे त्याबाबतचं असत्यता पसरवली जातेय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून निर्माण केलेला वाद या सगळ्याविरोधात उद्या मुंबईभर भाजप माफी मांगो निदर्शनं करणार आहे. मविआला मोर्चे काढण्याचा अधिकारचं नाही कारण मोर्चा ज्याबाबतीत काढला जात आहे, त्या बाबतचं असत्यता पसरवली जात आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

हिंदू देवीदेवतांचा अपमान हा वारकरी संप्रदायावर केलेला हल्ला

उद्धवजी वारकऱ्यांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह नाही का? हिंदू देवीदेवतांचा अपमान करण हिंदू मानला इजा पोहचली जाईल अशी वक्तव्ये समाजमाध्यमांवर आल्यानंतर उद्धव ठाकरे मौन सोडण्यास तयार नाहीत, कसे डोंबलाचे मोर्चे करता उद्या… समाजात भारतीय मनात असंतोष आहे. तो असंतोष प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण वारकरी सांप्रदाय, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथजी या सगळ्यांवरती केलेल्या चेष्ठा, खिल्ल्या, टिपण्ण्या, अलोचना, भंकस हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहन कस होत आहे, पण महाराष्ट्र हे सहन करु शकत नाही, त्यामुळे मुंबई भाजपने ठरवलं आहे की, महापुरुषांचा अपमान हे विशेषत; महाविकास आघाडी आणि शिवसेनेकडून सुरु आहे. हिंदू देवीदेवतांची जितकी टिंगल टावळी करता येईल, काय म्हणे भगवान श्री कृष्ण डेटला गेले होते. डेट करत होते हे शिवसेनेच्या उपनेत्याचं ज्ञान, कुठली ही संस्कृती, हिंमत कशी होते. त्यामुळे हिंदू देवीदेवतांचा अपमान हा वारकरी संप्रदायावर केलेला हल्ला आहे, हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी संपप्त प्रतिक्रिया शेलारांनी केली आहे.


भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत; ‘या’ प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -