घरताज्या घडामोडीकल्याणमध्ये एटीएम लुटारूंना अटक 

कल्याणमध्ये एटीएम लुटारूंना अटक 

Subscribe

आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून सुमारे ४९ लाख रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला होता.

बँकेचे एटीएम फोडून ४९ लाख रुपयांची रोकड लांबवणाऱ्या चोरट्याने २४ तासाच्या आत पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वर्दळ नसल्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळेस भयाण शांतता असते. काही चोरट्यांनी याचा फायदा घेत ५ जून रोजी कल्याण पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एटीएम सेंटर पैकी आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून सुमारे ४९ लाख रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला होता.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती, याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना महात्मा फुले चौक पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या लुटारूंना माग घेत ३ जणांना २४ तासाच्या आत अटक करून या गुन्ह्याची उकल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी एटीएम मशीन मधून चोरलेल्या रकमेतील काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित रकमेबाबत तपास सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या गुन्ह्याबाबत पोलिसांनी महात्मा फुले चौक पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती देण्यात येणार असल्याचे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -