घरदेश-विदेश'कर्नाटक विजयानंतरही काँग्रेसने सतर्क राहावे'; शशी थरूर यांचा पक्षाला इशारा

‘कर्नाटक विजयानंतरही काँग्रेसने सतर्क राहावे’; शशी थरूर यांचा पक्षाला इशारा

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये 135 जागा जिंकत काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवणार्‍या सराकर स्थापन केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या (siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK shivkumar) यांनी शपथ घेतली. पण या विजयानंतरही काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. काँग्रेसने सतर्क राहावे, असे म्हणत त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील खराब कामगिरीचा दाखला दिला. (‘Even after Karnataka victory, Congress should remain alert’; Shashi Tharoor’s warning to the party)

शशी थरूर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, काँग्रेस 2018 मध्ये कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला नाही, तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही विजय मिळवला होता. पण तरीही, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्व राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवला आणि काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. कर्नाटकमध्ये केवळ एकच जागा मिळाली, अशी माहिती शशी थरूर यांनी दिली.

- Advertisement -

थरूर म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यानच्या काही महिन्यांत मतदार आपल्या वर्तनात बदल करू शकतात. त्यामुळे आत्मसंतुष्ट होऊ नका. या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपाला केवळ 66 जागा मिळाल्या. एक मजबूत, प्रभावी स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक समस्यांवर भर दिल्यामुळे काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळवता आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे स्वतः कर्नाटकचे आहेत. राहुल आणि प्रियांका गांधीही प्रचारासाठी पोहोचल्या होत्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत स्थानिक समस्या, आर्थिक समस्या, बंगळुरूमधील पायाभूत सुविधांचा विकास यावर प्रचारात भर देण्यात आला, त्यामुळे काँग्रेसला विजय मिळवणे सोपे झाल्याचे शशी थरूर यांनी सांगितले.

काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद?

काँग्रेस नेत्यांमधील मतभेदाबाबत बोलताना शशी थरूर म्हणाले की, पक्षामधील मतभेद स्वाभाविक आहेत. राजकारणात लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणेही स्वाभाविक आहे. कारण ते पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या एकूण अजेंडासाठी वचनबद्ध असू शकतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला असे वाटू शकते की तो अजेंडा पुढे चालवण्यासाठी अधिक योग्य आहे.

- Advertisement -

लोकांना बदलाची गरज वाटल्यामुळे भाजपाचा पराभव

भाजपच्या पराभवाचे कारण सांगताना थरूर म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केंद्राने केला. कारण भाजपा स्थानिक पातळीवर कमकुवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा कर्नाटकात सरकार चालवायला येणार नाहीत, हे लोकांना माहीत असल्यामुळे लोकांना वाटले बदलाची गरज आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -