घरदेश-विदेशकच्च्या तेलाच्या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला सुनावले

कच्च्या तेलाच्या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला सुनावले

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरूवात झाल्यानंतर जगभरात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. पण यामुळे कच्च्या तेलाच्या मुद्द्यावरून भारत आणि युरोप देशामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरूवात झाल्यानंतर जगभरात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. पण यामुळे कच्च्या तेलाच्या मुद्द्यावरून भारत आणि युरोप देशामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अख्खा युरोप रशियाकडून कच्चे तेल आजही खरेदी करत आहे. परंतू तेच जर का भारताने स्वस्तात आपल्या इंधनाची गरज भागविण्यासाठी कच्च्या तेलाची खरेदी केली तर ते चुकीचे आहे, असे म्हणत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण या मुद्द्यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला नेहमीप्रमाणे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (External Affairs Minister Jaishankar addressed Europe on the issue of crude oil)

कच्च्या तेलाच्या मुद्द्यावरून यावेळीही युरोपीय युनियनच्या परराष्ट्र निती प्रमुखांनी भारताला चुकीचे म्हणत प्रश्न उपस्थित केले. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून ते आम्हाला विकताय, हे चुकीचे आहे असे युरोपीय युनियनच्या परराष्ट्र निती प्रमुखांकडून सांगण्यात आले. जोसेफ बोरेल यांनी भारताच्या रिफाईन्ड प्रॉडक्टवर बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे. जी उत्पादने भारतात तयार करण्यात येतात, त्यात रशियन तेलाचा वापर करण्यात येतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण उपस्थित करण्यात आलेल्या या मुद्द्यावरून जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

याबाबत बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, तुम्ही आधी युरोपीय संघ परिषदेचे नियम पहावेत. रशियन कच्च्या तेलाला तिसऱ्या देशाने खूप काही करून बदलले असेल तर ते रशियन मानले जात नाही. यासाठी तुम्ही आधी नियम नंबर 833/2014 पाहा आणि मग बोला, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

भारत रशियन तेलाचे रिफाइंड इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलमध्ये रूपांतर करून युरोपमध्ये त्याची विक्री करत आहे. त्यामुळे युरोपियन युनियनने भारतावर कारवाई करावी, असे बोरेल यांच्याकडून सांगण्यात आले होते. पाश्चात्य देश रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावरील कारवाई तीव्र करत आहेत आणि त्यावर दबाव आणत आहेत. दुसरीकडे भारत रशियन तेल खरेदीसाठी काम करत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, याबाबत त्यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. पण, या तेलावर प्रक्रिया करून ते युरोपातील देशाला विकले जात आहे त्यावर आक्षेप आहे, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -