घरदेश-विदेशसरकारी रुग्णालयात हाणामारी; पोलिसांसमोर चाकू भोसकून रुग्णांचा खून!

सरकारी रुग्णालयात हाणामारी; पोलिसांसमोर चाकू भोसकून रुग्णांचा खून!

Subscribe

रुग्णालयात रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीची एका तरुणाने चाकू भोसकून केली हत्या

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बल्लभगढ नजीक घडली आहे. सरकारी रुग्णालयात रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीची एका तरुणाने चाकू भोसकून हत्या केली असून या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर मारेकऱ्याला देखील अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ रुग्णालयातील सेक्टर २ मधील वृद्ध रहिवासी उमाशंकरची हत्या झाली असून ते महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून कार्यरत होते. ते काही दिवसांपुर्वीच सेवा निवृत्त झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सेक्टर -२ च्या RWAचे विद्यमान प्रमुख होते, त्यांचा RWAच्या माजी प्रमुखांसोबत कोणत्याही तरी गोष्टीवरून वाद झाला होता.

- Advertisement -

पोलिसांसमोरच रुग्णांची चाकू भोसकून हत्या

बुधवारी रात्री RWAच्या माजी प्रमुख आणि प्राध्यापक उमाशंकर दोघांमध्ये हाणामारी झाली आणि उमाशंकर पोलिसात गेले. पोलिसांना याबाबत तक्रार करण्यास सांगितले. पोलीस अधिकाऱ्यानी त्यांना पोलिसांसह बल्लभगड येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवले. यावेळी एका तरूणाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे रुग्णालयात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घडलेल्या घटनेबद्दल तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला असून मारेकऱ्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांसमोरच सरकारी रुग्णालयात हत्या झालाचा धक्कादायक प्रकार घडूच कसा शकतो, असा प्रश्न सध्या या प्रकारामुळे उपस्थितीत होत आहे.


मोबाईल लॅबमुळे आता खेड्या-पाड्यात होणार कोरोना चाचणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -